रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा…

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट(cricket) संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये एकूण पाच सामने खेळले जाणार आहेत. पर्थमध्ये झालेला पहिला सामना भारताने 295 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकला. गाबामधील तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता चौथा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवला जाणार आहे.

मेलबर्नमधील सामन्याआधी भारतीय संघ(cricket) सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने हिंदी प्रश्नांचीही उत्तर दिलं. अखेरीस जेव्हा ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी जडेजाला इंग्रजीत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा जडेजा आपल्याला बस पकडायची आहे सांगून निघून गेला.

वेळेची कमतरता असल्याने काही भारतीय पत्रकारही प्रश्न विचारु शकले नाहीत. पण ऑस्ट्रेलिया मीडियाचे पत्रकार यावरुन फार नाराज झाल्याचं दिसलं. भारतीय संघाचे मीडिया मॅनेजर मौलिन पारीख यांनी त्यांना ही पत्रकार परिषद फक्त भारतीय प्रसारमाध्यमांसाठी असल्याचं समजावून सांगितलं. पण ऑस्ट्रेलिया मीडियाला हे पटलं नाही.

ऑस्ट्रेलियाचे काही पत्रकार भारतीय संघाचे मीडिया मॅनेजर मौलिन पारीख यांच्यावर संतापल्या दिसलं. ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी त्यांच्याशी गैरवर्तनही केलं.

विमानतळावर भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाचा प्रसारमाध्यमांशी वाद झाला. मीडियाकडून आपल्या मुलांना शूट केलं जात असल्याची शंका आल्याने विराट कोहलीने प्रसारमाध्यमांना सुनावलं. विराट कोहली आपल्या कुटुंबाप्रती अती संवेदनशील आहे. यामुळेच जेव्हा विमानतळावर त्याला आपल्या परवानगीशिवाय मुलांना शूट केलं जात आहे समजलं तेव्हा त्याचा संताप झाला.

Channel 7 ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅमेरा आपल्या मुलांच्या दिशेन असल्याचं दिसल्यानंतर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराशी शाब्दिक वाद झाला. “वेटिंग कॅमेरा पाहिल्यानंतर विराट कोहली काहीसा संतापला होता. पण त्याचा गैरसमज झाला होता.

मीडिया आपल्याला मुलांसह शूट करत असल्याचं त्याला वाटलं,” असं चॅनेल 7 रिपोर्टर थियो डोरोपौलोसने सांगितलं. यानंतर विराट कोहलीने आपली भूमिका स्पष्ट केली. “मला माझ्या मुलांसह प्रायव्हसी हवी आहे. मला विचारल्याशिवाय तुम्ही शूट करु शकत नाही,” असं त्याने सांगितल्याचं वृत्तात आहे.

हेही वाचा :

गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ

ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार

ती थेट मांडीवर बसली अन्… धावत्या कारमध्ये कपलचे अश्लील चाळे, Video Viral