IPL चॅम्पियन होण्यासाठी RCB ची मोठी रणनीती, मुंबईकरावर सोपवली महत्वाची जबाबदारी

आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघ त्यांच्या सपोर्ट स्टाफची बांधणी करताना दिसत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आयपीएलच्या सुरुवातीपासूनच या स्पर्धेचा भाग असला तरी त्यांना अद्याप एकदाही आयपीएलचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. बऱ्याचदा आयपीएल ट्रॉफीने त्यांना हुलकावणी दिली, मात्र यंदा आयपीएल 2025 च्या विजेतेपदाची ट्रॉफी(trophy) उंचावण्यासाठी आरसीबीने एक मोठी रणनीती आखली असून एका मुंबईकराला संघात मोठी जबाबदारी दिली आहे.

आरसीबीने मुंबई रणजी ट्रॉफी संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक ओंकार साळवी याला आरसीबीचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमल आहे. मुख्य प्रशिक्षक ओमकार साळवीच्या नेतृत्वात मुंबईच्या रणजी ट्रॉफी (trophy)संघाने मागील ८ महिन्यांमध्ये रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीचे विजेतेपदं जिंकले होते.

ओमकार साळवी हा मूळचा मुंबईचा असून तो यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफचा सुद्धा भाग राहिलेला होता. तो गोलंदाजी प्रशिक्षक असताना केकेआरने आयपीएल 2024 चं विजेतेपद सुद्धा पटकावलं होतं. ओमकार साळवी याने आतपर्यंत फक्त १ ए लिस्ट सामना खेळला आहे मात्र त्याचा कोचिंगचा अनुभव जास्त आणि चांगला अनुभव आहे. ओमकार आता आरसीबी सोबत जोडला गेल्याने संघ अधिक मजबूत झालेला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मेगा ऑक्शनपूर्वी केवळ 3 खेळाडूंना रिटेन केलं असून यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांचा समावेश आहे. यापैकी यशला 5 कोटी, पाटीदारला 11 कोटी तर कोहलीला 21 कोटी देऊन रिटेन करण्यात आलेलं आहे. आता आरसीबीच्या टीममध्ये एकूण 22 स्लॉट्स शिल्लक असून खेळाडूंना खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे 83 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर आरसीबीकडे 3 आरटीएम कार्ड शिल्लक आहेत.

हेही वाचा :

कोल्हापूरच्या राजकारणात आता खानविलकरांची एन्ट्री

‘प्रियंका गांधींचा हल्ला: मोदींच्या ठाकरे प्रेमाचा मुखवटा फाडला, गुजरातचे मंबाजी!’ – सेनेचा घणाघात

कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?