शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला तयार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती(times) पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवभक्तांमध्ये संतापाचा कडेलोट झाला असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. झाललेी घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

या सर्व पार्श्वभूमीवर आज (29 ऑगस्ट) मुख्यमंत्री (times)एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एकदा नव्हे, तर शंभरवेळा शिवरायांची माफी मागायला तयार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, की शिवरायांची एकदा नवे तर शंभरवेळा माफी मागायला तयार आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा पुतळा कसा आहे उभा राहील हे पाहिलं पाहिजे.

विरोधकांना राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा विषय हा राजकारणाचा विषय नसून आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्यासंदर्भात आमची काल बैठक झाली असल्याचे ते म्हणाले. पुतळा पुन्हा एकदा उभा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून तज्ज्ञ लोकांचा समितीमध्ये समावेश करण्यात येईल. लवकरात लवकर ही समिती काम सुरू करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा

जिओचा दिवाळी धमाका… अंबानींनी केली AI क्लाउडची घोषणा

नव्या गाण्यामधून अरिजीतने पीडितेसाठी मागितला न्याय; एकदा ऐकाच!