सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी,अपक्ष अर्ज दाखल, मविआची डोकेदुखी वाढली

सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी(itr filing) वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी परस्पर सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी ओढावली होती.

त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर येत आहे(itr filing). काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तसेच उद्या ते सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचेही बोलले जात आहे.

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम होता.पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीरही करुन टाकली.आणि तिथेच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला.मागील 5 वर्षांपासून लोकसभेची तयारी सुरू केलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी ठाकरेंच्या या कुरघोडीवरुन उघड-उघड नाराजीही व्यक्त केली.

ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सांगलीवरुन गेल्या 15 दिवसांपासून घमासान सुरु होते.पण ठाकरेंनी माघार घेतलीच नाही उलट काँग्रेसलाच दोन पावलं माघारी यावं लागलं.मोठा राजकीय वारसा पाठिशी असतानाही विशाल पाटलांना आपली तलवार म्यान करावी लागली.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांनी, प्रतिष्ठेची केली कोल्हापूरची निवडणूक….!

कोल्हापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री म्हणाले, ‘ये तो बस ट्रेलर है…’

एकच गट्टी राजू शेट्टी! कोल्हापुरात राजू शेट्टींकडून विराट शक्तीप्रदर्शन; म्हणाले, खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात