युनिअन पब्लिक सर्व्हिस कौन्सिल (UPSC) मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरतीच्या(Recruitment) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. सीविल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंगच्या रिक्त जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत.
अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन स्वरूपात आहे. महत्वाची बाब म्हणजे या भरतीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे, तर इच्छुक उमेदवारांनी या भरतीबाबत सखोल माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
UPSC द्वारे आयोजित या भरती(Recruitment) प्रक्रियेमध्ये १८ सप्टेंबरपासून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनेक उमेदवारांनी या भरतीमध्ये अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. ८ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन UPSC ने केले आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना आधी काही अटी शर्तींना पात्र होणे अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज करता येणार नाही.
मुळात, अधिसूचनेमध्ये शैक्षणिक अट नमूद करण्यात आली आहे. अर्ज कर्ता उमेदवार सिविल, मैकेनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये पदवीधर हवा. उमेदवाराकडे या क्षेत्रामधील डिग्री असली पाहिजे किंवा या क्षेत्रामधून उमेदवाराचा डिप्लोमा पूर्ण असावा. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे.
महिला वर्ग, एससी, एसटी तसेच दिव्यांग वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे, तर सामान्य श्रेणीतील तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रुपयांचे भुगतान करावे लागणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरावयाचे आहे.
विविध निवड प्रक्रियेच्या मार्फत उमेदवाराची निवड केली जाईल. एकंदरीत, तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यामध्ये प्रारंभिक परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा तर शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवाराची मुलाखत किंवा पर्सनेलिटी टेस्ट घेण्यात येईल.
हेही वाचा:
लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!
शाहरुख खानला तरुणीने दिला इतका जोरदार धक्का, पडता-पडता वाचला! Video
संजय राऊतांना दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर, शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती