राज्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली, नाराज भुजबळ मुंबईत; कोणता निर्णय घेणार?

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ(political news) यांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भुजबळांना काही नवीन ऑफर दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रिपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले. मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे.

आता भाजपनेही(political news) यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत. दरम्यान, या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कूच केले असून येथेही ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या. त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता धुसर झाली आहे. छगन भुजबळ अद्याप पक्षातच आहेत. मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम, मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत.

केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे. त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता. त्यामुळे या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्रिपद मिळू शकतं. मात्र भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भुजबळ काय निर्णय घेतात याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, बुधवारी नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर दोन दिवस भुजबळ शांत राहिले. आता मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी भुजबळ मुंबईकडे रवाना झाले होते. येथेही समर्थकांशी चर्चा करण्याचे त्यांचे नियोजन आहे. या चर्चेनंतर छगन भुजबळ काय निर्णय घेतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहतात की भाजपसोबत जातात किंवा आणखी काही निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

नवर्षापासून बस प्रवाशांच्या मोबाईलवर लोकेशन दिसणार

इंधनदरात दिलासा! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

मोठी बातमी! मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अखेर अटक