आमंत्रण नसतानाही बच्चन यांच्या पार्टीत पोहोचले रेखा काही तास बाथरूममध्ये

बॉलिवुडमधील लव्ह स्टोरींची चर्चा होते तेव्हा महानायक (love story)अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्या नावांची नेहमीच चर्चा होते. दोघांच्या अधूऱ्या प्रेमकहाणीबद्दल अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील. या दोघांबद्दलचे अनेक किस्से आहेत, यापैकी एक असा किस्सा आहे जो अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये घडला.

अमिताभ बच्चन यांचा 60 वा वाढदिवस मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला होता. या वाढदिवसाला अनेक नामवंत (love story)लोकांना आमंत्रण देण्यात आले होते, पण रेखा यांना आमंत्रण नव्हते. मात्र, रेखा या निमंत्रण नसतानाही आपल्या मैत्रीण फरजानासोबत वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचल्या होत्या. रेखाला तिथे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

यावेळी रेखा यांच्या उपस्थितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला, पण रेखा यांनी तात्काळ फोटो काढून देण्यास नकार दिला. मीडियावाल्यांच्या उपस्थितीमुळे रेखा यांनी चक्क बाथरूममध्ये लपून बसणे पसंत केले आणि जोपर्यंत मीडियावाले तिथून जात नाहीत तोपर्यंत त्या(love story) बाहेर आल्या नाहीत. काही तासांनंतर रेखा बाथरूममधून बाहेर आल्या.

रेखा यांनी असे का केले याचे कारण अजूनही स्पष्ट नाही, पण अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अशा किस्स्यांनी बॉलिवुडमधील गॉसिपला नेहमीच उधाण येते.

हेही वाचा :

उपवासाचा स्पेशल: घरीच बनवा मऊ-मऊ, जाळीदार फराळी ढोकळा

सांगली : चांदोली धरणात जलसाठा वाढल्याने वीजनिर्मितीला सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, आषाढीच्या उत्साहात भर