बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आपल्या काळातील प्रसिद्ध (pay)अभिनेत्रींपैकी होत्या. त्यांच्या अभिनयाचं आजही कौतुक केलं जातं. रेखा यांनी बदलत्या काळासह स्वत:लाही बदललं आणि तशा भूमिका साकारात प्रेक्षकांच्या मनात स्वत:ला जिवंत ठेवलं. दरम्यान रेखा यांच्याबद्दल असंही बोललं जातं की, त्या सेटवर असताना फार नखरे दाखवतात. रेखा यांच्यासह अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राकेश रोशन यांचा अनुभव मात्र वेगळा आहे. आपण एकदा रेखाला तिच्याबाबत होणाऱ्या या चर्चांबद्दल थेट विचारलं होतं असा खुलासा त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

“रेखामध्ये एका क्वालिटी आहे, जी फार कमी अभिनेत्रींमध्ये आहे. ती प्रत्येक चित्रपटात वेगळी आहे. मी तिच्यासह खुबसूरत, आक्रमण आणि औरत अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जेव्हा मी तिच्याकडे खून भरी मांग चित्रपटातील आईच्या भूमिकेबद्दल विचारण्यास गेलो तेव्हा मला अनेकांनी सावध केलं होतं. मला त्यांनी सांगितलं होतं की, तू तिच्यासह चित्रपट करत आहेस पण ती कधीच वेळेत येत (pay)नाही, वेळ संपण्याआधी पळून जाते,” असंही राकेश रोशन यांनी सांगितलं.
रेखा यांच्या नखरे आणि अव्यावसायिक वर्तनाबद्दल ऐकल्यानंतर राकेश रोशन यांनी थेट त्यांनाच विचारलं होतं. यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं याचा खुलासाही राकेश रोशन यांनी केला आहे. “मी नेहमीच तिच्याबद्दल अशा अफवा ऐकल्या आहेत, पण जेव्हा जेव्हा मी तिच्यासोबत काम केलं तेव्हा मला कधीही तसा अनुभव आला नाही. जेव्हा मी रेखाकडे दिग्दर्शक म्हणून गेलो तेव्हा मी तिला सांगितलं, ‘ऐक, हा माझा (pay)दुसरा चित्रपट आहे आणि हा एक कठीण विषय आहे.

हा एक महिला-केंद्रित चित्रपट आहे. मी या चित्रपटात जोखीम घेत आहे. कथा अशी होती की क्लायमॅक्समध्ये पत्नी तिच्या पतीला मारते. मी तिला स्पष्टपणे विचारले, ‘तू मला काही त्रास देणार नाहीस ना?’ ती म्हणाली, ‘तू काय म्हणतोयस? मी कधी हे केलं आहे का? मी फक्त अशा लोकांना त्रास देते जे माझे पैसे थकवतात किंवा ते त्यांचे वचन पूर्ण करत नाहीत’. मी म्हणालो, ठीक आहे,” अशी आठवण राकेश रोशन यांनी सांगितली.
हेही वाचा :
मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू
प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral
‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा