गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (vegetables)दि.१६ राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. गेल्या आठवड्याl इतकीच बाजारात आवक होती़ दरम्यान फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि शेवग्याच्या भावात घसरण झाली असून हिरवी मिरची आणि मटारच्या भावात वाढ झाली असून उर्वरित भाज्यांची मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथुन घेवडा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ५ ते ६ टेम्पो, राजस्थान येथून गाजर ५ ते ६ ट्रक, राजस्थानातून १ टेम्पो मटार, कर्नाटकातून ३ टेम्पो भुईमुग शेंग, कर्नाटक येथून पावटा ३ ते ४ टेम्पो, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ३ ते ४ टेम्पो, गुजरात, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे १० ते १२ टेम्पो आवक झाली होती.
तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले (vegetables)सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो , सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ९० ते १०० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो आवक झाली होती.
कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि राजगिºयाच्या भावात घसरण
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी दि. १६ कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि राजगिºयाच्या भावात घसरण झाली असून चाकवत, पुदीना, अंबाडी, मुळे, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली होती.
डाळींब, स्ट्रॉबेरी आणि पपईच्या भावात घसरण
गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळबाजारात(vegetables) रविवारी दि. १६ डाळींब, स्ट्रॉबेरी आणि पपईच्या भावात घसरण झाली असून लिंबू, अननस, संत्रा, मोसंबी, कलिंगड आणि चिक्कूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी दि.१६ फळबाजारात मोसंबी २५ ते ३० टन, संत्रा ६० ते ६५ टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबांची सुमारे दीड तेसोळाशे गोणी, कलिंगड ६० ते ७० टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, अननस ६ ट्रक, पेरु ३०० ते ४०० क्रेट इतकी आवक झाली होती.
हेही वाचा :
सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट
बेडरुमचा दरवाजा उघडला, समोर पत्नी नको त्या अवस्थेत पाहून …
‘तू हिरोईन वाटतेस तरी का?’ विद्या बालनला पालकांसमोरच दिग्दर्शकाने केलं अपमानीत
कुत्र्याशी तुलना, आज ही अभिनेत्री आहे ३०१० कोटींच्या साम्राज्याची सून
सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट