यंत्रमागधारकांना दिलासा की फसवणूक? महाराष्ट्र सरकारची ऑनलाईन नोंदणी अट शिथिल, परंतु 2025 पर्यंत कायम

महाराष्ट्र सरकारच्या ताज्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील यंत्रमागधारकांना विज बिलातील(electricity bill) अतिरिक्त सवलत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन नोंदणीच्या अटीला शिथिल करण्यात आले आहे. या निर्णयामुळे यंत्रमागधारकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या अटीची अंमलबजावणी मात्र 15 मार्च 2024 पासून होणार आहे.

विशेष म्हणजे, ही अट केवळ मार्च 2025 पर्यंत शिथिल करण्यात आली असून, ती रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांना भविष्यात पुन्हा नोंदणी प्रक्रियेच्या वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे यंत्रमागधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.

विज बिलात (electricity bill)15 मार्च 2024 पासून लागू होणाऱ्या सवलतींची बिले येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे अभिनंदन किंवा मिठाईचे आदान-प्रदान करू नये, अशी सूचना यंत्रमागधारकांच्या संघटनेतून करण्यात आली आहे. हा निर्णय यंत्रमागधारकांना लाचार बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे यंत्रमागधारकांवर होत असलेली आर्थिक आणि मानसिक ओढाताण कायम राहणार आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक; भाजपसाठी आरएसएस मोठे पाऊल उचलणार

तू 1500 रुपये परत घेऊन दाखवच, बघते तुझा काय कार्यक्रम करते, सुप्रिया सुळेंचा रवी राणांना इशारा

कांजिवरम साडी… बॉयफ्रेंडची साथ… तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर