नवी दिल्ली: 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या (froud)आरोपाखाली तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, मनी लाँड्रिंगच्या अन्य प्रकरणात अटक असल्याने तो तत्काळ तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही.
सुकेश चंद्रशेखरवर अनेक फसवणुकीचे आरोप आहेत. त्याने अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांची फसवणूक केल्याचे म्हटले जाते. या प्रकरणात त्याला 2022 मध्ये अटक करण्यात आली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाने सुकेश चंद्रशेखरला 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्याला देश सोडण्याची परवानगी नाही आणि तो तपास यंत्रणेला सहकार्य करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सुकेश चंद्रशेखरला जामीन मिळाल्याने त्याच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, तो अद्याप तुरुंगातच राहाणार असल्याने त्याच्या विरोधकांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा:
छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत; आम्ही त्यांची माफी मागतो: पंतप्रधान मोदी
सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स आयोजित दहीहंडी स्पर्धेत उत्साहाचा कळस
पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला आंदोलनाचे ग्रहण