देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन: देशासह उद्योगविश्वावर शोककळा पसरली

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२४: देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी(business news) एक असलेल्या रतन टाटा यांचे आज निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांची प्रकृती खालावल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये (ICU) उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश आणि उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.

टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी रतन टाटा यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. चंद्रशेखरन म्हणाले, “रतन टाटा यांच्या जाण्यामुळे आम्ही एका महान नेत्याला गमावले आहे. त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे टाटा समूहाला जागतिक स्तरावर विशेष स्थान प्राप्त झाले.”

रतन टाटा यांच्या जीवनाचा आढावा

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. १९६१-६२ मध्ये टाटा समूहात एक सामान्य कर्मचारी म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे, जेआरडी टाटा यांनी त्यांना टाटा(business news) समूहाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी १९९१ मध्ये समूहाचे चेअरमनपद स्वीकारले आणि आपल्या नेतृत्वाखाली समूहातील विविध कंपन्यांना जागतिक यश मिळवून दिलं.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली १९९८ साली टाटा मोटर्सने संपूर्ण भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार बाजारात आणली. त्यांच्या मनात नेहमीच लोकांसाठी स्वस्त, किफायतशीर आणि भारतीय कार बनवण्याचे स्वप्न होतं, जे ‘इंडिका’च्या निर्मितीमुळे पूर्ण झालं. २००८ साली त्यांनी ‘टाटा नॅनो’ ही जगातील सर्वात स्वस्त कार बाजारात आणली, ज्यामुळे सर्वसामान्य माणसांनाही कार खरेदी करण्याचे स्वप्न साकार झाले.

२०१२ साली रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देऊन सायरस मिस्त्री यांना पदभार सोपवला. मात्र, मिस्त्रीसोबतच्या वादानंतर २०१६ मध्ये पुन्हा एकदा वर्षभरासाठी त्यांनी समूहाचे नेतृत्व स्वीकारले. सध्या नटराजन चंद्रशेखरन टाटा समूहाचे चेअरमन आहेत.

रतन टाटा यांचा कुटुंब आणि वारसा

रतन टाटांचे धाकटे भाऊ जिम्मी टाटा आणि नोएल टाटा आहेत. नोएल टाटांना लेह टाटा, माया टाटा, आणि नेव्हिल टाटा ही तीन मुले आहेत. रतन टाटा यांची जीवनभर अविवाहित राहण्याची निवड एक चर्चेचा विषय होती, परंतु त्यांचा मानवीय दृष्टिकोन, उद्योगात केलेले योगदान, आणि सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेला सहभाग त्यांना एक अनमोल वारसा देऊन जातो.

रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाला एक प्रेमळ आणि सोज्वळ नेते गमावले आहे. त्यांच्या जाण्यानं एक युग संपलं, मात्र त्यांच्या कार्याच्या आठवणींमुळे ते सदैव जिवंत राहतील.

हेही वाचा:

2025 आधी ‘या’ 5 राशींना शनी करणार मालामाल

बनावट कोव्हिड लस वापरून हत्येचा प्रयत्न; ब्रिटीश डॉक्टरने आईच्या साथीदाराला संपवण्याचा प्रयत्न केला!

राजकीय फायद्यासाठी हिंदू समाज तोडणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता नाकारेल: पंतप्रधान मोदी