कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान बनल्यापासून भारत हा आता पूर्वीचा कमजोर, अशक्त राहिलेला नाही, तर तो जशास तसे उत्तर देणारा बलवान भारत बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्र समूहाकडून आता त्याची गांभीर्याने दखल घेतली जाऊ लागली आहे आणि हे गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या ठाम आणि ठोस भूमिकेमुळे घडले आहे आणि घडत आहे. आत्ताही पंतप्रधानांचे प्रमुख सहकारी आणि परराष्ट्रमंत्री(Minister) एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या इस्लामाबाद या राजधानीत जाऊन तेथील सत्ताधाऱ्यांना चार खडे बोल सुनावले आहेत, हे बदलत्या भारताचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणावे लागेल.
भारतामध्ये सातत्याने आतंकवादी कारवाया करणाऱ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने काश्मीर प्रश्नाचे तुणतूणे वाजवणाऱ्या पाकिस्तानशी भारताने चर्चा थांबवली आहे. मैत्रीचे पाऊल मागे घेतले आहे. विशेषतः भारताने पाकिस्तानच्या भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर, पाकिस्तान भयभीत झाला होता. आमच्या देशात घुसाल तर तुमच्या देशात आतपर्यंत घुसून अद्दल घडवणारी कारवाई करू असा सज्जड दम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेव्हा दिला होता.
सशक्त बनलेल्या, बलवान भारताने गेल्या काही वर्षात चिनी ड्रॅगन ला सुद्धा धडा शिकवलेला आहे. आता तर चीनने भारतीय सीमेवर जमा केलेले सैन्य माघारी घेण्यास सुरुवातही केलेली आहे. हे परराष्ट्र मंत्री(Minister) एस जयशंकर यांच्या परराष्ट्र नीतीचे यश आहे.
पाकिस्तानच्या इस्लामाबाद या राजधानीत शांघाय परिषद पार पडली आहे. आणि या निमित्ताने तब्बल नऊ वर्षांनी भारताचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानच्या भूमीत पोहोचले होते. तेथे त्यांचे पाकिस्तानने स्वागत केले. इतकेच नाही तर या परिषदेच्या निमित्ताने कोणताही आतंकवादी घातपाताचा प्रकार घडू नये म्हणून या राजधानीच्या शहरात लोक डाऊन जाहीर करण्यात आले होते. या परिषदेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताची भूमिका स्वच्छ स्पष्ट आणि समज देणाऱ्या भाषेत विशद केली. एकीकडे दहशतवादी कारवाया करायच्या आणि दुसरीकडे व्यापार संदर्भात बोलणी करायची ही परस्पर विरोधी दुहेरी नीती भारत कदापिही खपवून घेणार नाही. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारताशी निखळ मैत्री केली पाहिजे आणि आमची मैत्री ही प्रामाणिक आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले पाहिजे.
सदस्य राष्ट्रांचा परस्परांशी विश्वास असला पाहिजे. अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. चीनने आपली विस्तारवादी भूमिका मागे घेतली पाहिजे. भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चीनकडून होता कामा नये असा इशाराही त्यांनी चीनच्या प्रतिनिधीला दिला आहे. सातत्याने भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तान बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणाऱ्या चीनला पाकिस्तानच्या मदतीने अस्थिर करावयाचे आहे. पण हे कदापिही शक्य होणार नाही. आता भारत पूर्वीचा राहिला नाही असे अप्रत्यक्षपणे एस जयशंकर यांनी या परिषदेत सदस्य राष्ट्रांना सांगितले आहे. तुमच्या मनातील निखळ विचार कृतीतून दिसले पाहिजेत तरच तुमच्याशी सुसंवाद साधण्याबद्दल आम्ही विचार करू. असा सल्लाही त्यांनी दिला असला तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते सुधारतील असे वाटत नाही.
तेथील राज्यकर्त्यांचा काश्मीरचा प्रश्न उपस्थित केल्याशिवाय दिवस जात नाही हे वास्तव आहे. त्यामुळे जगासमोर हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागणाऱ्या पाकिस्तानला कोणताही देश दारात उभे करत नाही. कारण या देशाला देण्यात आलेली आर्थिक मदत ही तेथील जनतेसाठी वापरली जात नाही तर आतंकवादी कारवायांसाठी दहशतवादी संघटनांवर उधळली जाते हे आता लपून राहिलेले नाही.
370 कलम रद्द झाल्यानंतर केंद्रशासित बनलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका सुविहितपणे पार पडल्या. लोकशाही मार्गाने तेथील सरकार सत्तेवर आले. हे पाकिस्तानला रुचलेले नाही. निवडणूक काळात काश्मीर खोऱ्यात एकही आतंकवादी घटना भारतीय लष्कराने तसेच सीमा सुरक्षा दलाने घडू दिली नाही. काश्मीर खोऱ्यातील विधानसभेच्या निवडणुका लोकशाही मार्गाने झाले असल्याने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा संदेश जगभर गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच परराष्ट्रमंत्री(Minister) एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडले आहे. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा भारताने जगासमोर आणला आहे. कोणत्याही प्रकारची लेचीपेची, कचखाऊ भूमिका घ्यायची नाही असा निर्धार करून पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्याची किमया भारतीय राज्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षात करून दाखवली आहे. इस्लामाबाद येथे झालेल्या शांघाय परिषदेत त्याचे प्रत्यंतर पुन्हा आले आहे.
हेही वाचा:
अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली मलायका
अरमान मलिकचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला
अजित पवारांना धक्क्यावर धक्के; आधी 600 आता तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा?