नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा(Inflationary) दर कमी झाला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48 टक्क्यांवर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर महागाई पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर 6.21टक्के होता, ज्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढले होते. मात्र, या महिन्यात महागाई दर कमी झाला आहे.
पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात घसरण झाल्याने अन्नधान्याच्या भावात वाढ झाली होती. अन्नधान्य महागाई दरात घसरण होत 9.04 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्य महागाई(Inflationary) दर 10.87 टक्के होता. चालू आर्थिक वर्षात महागाई दर 4.08 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
अन्नधान्य चलनवाढ, जी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय) जवळपास निम्मी आहे. ती नोव्हेंबरमध्ये 9.04 टक्के होती. जी मागील महिन्यात 10.87 टक्के होती. मात्र ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळे परिणाम दिसून आले. ग्रामीण चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये 6.68 टक्क्यांवरून 9.10 टक्क्यांवर गेला आहे, तर शहरी महागाई 5.62 टक्क्यांवरून 8.74 टक्क्यांवर पोहोचली आहे.
धान्य आणि डाळींच्या महागाई दरातही किंचित घट झाली आहे. डाळींचा महागाई दर 7.43 टक्क्यांवरून 5.41 टक्क्यांवर आला आहे. तसेच भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किमतीतील स्थिरता हे महागाई कमी होण्याचे प्रमुख कारण होते. सप्टेंबरमध्ये खाद्यतेलावर लादण्यात आलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा परिणाम होऊनही आता त्यांच्या किमती स्थिर राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
महागाईबाबतची चिंता पूर्णपणे संपलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी महागाई दर 4.8 टक्के असा अंदाज वर्तवला आहे, जो पूर्वी 4.5 टक्के होता. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चौथ्या तिमाहीत महागाईचा दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे, परंतु आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत अन्नधान्य महागाई उच्च पातळीवर राहू शकते.
महागाईचा थेट संबंध क्रयशक्तीशी असतो. उदाहरणार्थ, जर महागाई दर 6 टक्के असेल, तर कमावलेले 100 रुपये फक्त 94 रुपये असतील. त्यामुळे महागाई लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. अन्यथा तुमच्या पैशाचे मूल्य कमी होईल. महागाईची वाढ आणि घसरण उत्पादनाची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. जर लोकांकडे जास्त पैसे असतील तर ते अधिक वस्तू विकत घेतील. जास्त वस्तू घेतल्यास वस्तूंची मागणी वाढेल आणि मागणीनुसार पुरवठा झाला नाही तर या वस्तूंच्या किमती वाढतात.
हेही वाचा :
एक चूक जीवावर बेतली! वर्गात चिमुकलीने गिळले पेनाचे टोपण अन् नको ते घडलं…
अल्लू अर्जुनच्या अटकेतील मृत महिलेच्या पतीचा यू-टर्न, केस घेणार मागे
‘…तर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता होऊ शकते’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा इशारा