अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘या’ पक्षाकडून बक्षीस जाहीर

मुंबई: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मुंबई पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणावरून राजकारणही(politics) तापलं असून अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना शर्मिला ठाकरे यांनी बक्षीसाची घोषणा केली आहे.

अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना शर्मिला ठाकरे(politics) यांच्याकडून 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर कऱण्यात आले आहे. हे 51 हजार रुपये महत्त्वाचे नाहीत.पण पोलिसांच्याही जीवावर बेतलं असते. अशी प्रतिक्रीया मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी दिली आहे.

“दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार कऱणाऱ्या आरोपीविरोधात संपूर्ण राज्यात संतापाची भावना होती. त्यातच त्याने पोलिसांवरही पिस्तुल रोखण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत निंदणीय बाब आहे. ज्याने तीन-चार वर्षांच्या मुलींवर हात टाकताा मागे पुढे पाहिले नाही त्याचा एन्काऊंटर योग्य आहे, असही अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

तसेच, आमचे सरकार असते तर आरोपीचा एन्काऊंटरच केला असता.असं मी यापूर्वीही बोललो होतो. पण आरोपीने पोलिसांचे पिस्तुल रोखून स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतला. एन्काऊंटरची ही घटना योग्य आहे.

आम्ही त्याचं समर्थनही करतो. शर्मिला ठाकरे आरोपीचे एन्काऊंटर करणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. ते 51 हजार रूपये महत्त्वाचे नाहीत. पोलिसांच्या जीवावर बेतलं असते. आम्ही पोलिस खात्याचं अभिनंदन करतो,” असं म्हणत अविनाश जाधव यांनी पोलिसांचेंही कौतुक केलं आहे.

हेही वाचा:

मिरवणुकीत विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू; मंडळ अध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल

बदलापूर प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

भावाच्या अंत्यविधीला न बोलावल्याने भावाचा खून; डोक्यात दगड घालून केला हल्ला