‘आयुष्यातील सर्वात कठीण…’, दिल्लीचा निरोप घेताना ऋषभ पंतने चाहत्यांना रडवलं! Video

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहिलेल्या ऋषभ पंतला(rishabh pant) आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने विकत घेतलं आहे. पंतवर तब्बल 27 कोटींची बोली लावून लखनऊने ऑक्शनमधून त्याला खरेदी केले. त्यामुळे ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंत सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

ऑक्शननंतर प्रथमच मंगळवारी पंतने याबाबत प्रतिक्रिया दिली. पंत जिथे नवीन संघासोबत जोडण्यास उत्सुक आहे तिथेच तो दिल्ली कॅपिटल्स सोडताना देखील भावुक झालेला दिसला. सोशल मीडियावर ऋषभ पंतने(rishabh pant) एक व्हिडीओ आणि भावुक पोस्ट शेअर करून त्याच्या फॅन्सला संदेश दिला.

ऋषभ पंत 2016 पासून दिल्ली कॅपिटल्सशी जोडला गेला आहे. त्याच्या खांद्यावर फ्रेंचायझीने कर्णधार पदाची जबाबदारी सुद्धा सोपवली. मात्र ऑक्शनपूर्वी दिल्लीने त्याला रिटेन न केल्यामुळे त्यांना मेगा ऑक्शनमध्ये उतरावे लागले. ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने देखील त्याला खरेदी करण्यासाठी 20 कोटींपर्यंत बोली लावली, मात्र लखनऊने 20 कोटीवरून थेट 27 कोटींची बोली लावली आणि तेवढी रक्कम खर्च करणं शक्य नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स पंतला पुन्हा खरेदी करू शकली नाही.

मंगळवारी ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली. यासोबत त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला ज्याला त्याने ‘तू आती है सीने में, जब-जब सांसे भरता हूं…’ हे गाणं मागे लावलं होतं. 26 वर्षीय पंतने दिल्ली सोबत त्याचा 9 वर्षांचा प्रवास आठवला आणि त्याने आपल्या व्हिडीओची सुरुवात ‘ऐ दिल्ली वालो, मैं ऋषभ पंत…’ अशी केली.

दिल्ली कॅपिटल्ससोबतचा प्रवास हा खूपच अप्रतिम होता. मैदानावरील रोमांच पासून ते बाहेरच्या क्षणांपर्यंत, मी कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे इथे मी वाढलो आहे. मी इथे किशोरवयात असताना आलो आणि गेल्या नऊ वर्षांत टीम आणि मी एकत्र वाढलो. हा प्रवास सार्थकी लावणारे चाहते आहेत.

चाहत्यांनो तुम्ही मला प्रेम दिलंत, आनंद दिलात आणि माझ्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यात माझ्या पाठीशी उभा राहिलात. मी पुढे जात असताना, तुम्ही माझ्यावर केलेलं प्रेम माझ्या हृदयात सदैव राहील. मी जेव्हाही मैदानात येईन तेव्हा तुमचे मनोरंजन करण्यास उत्सुक असेन. माझे कुटुंब झा;झाल्याबद्दल आणि हा प्रवास इतका खास बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये पंतपूर्वी श्रेयस अय्यरवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली होती. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26.75 कोटींना विकत घेतले होते. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्कचा 24. 75 कोटी मिळवण्याचा रेकॉर्ड मोडला होता.

मात्र त्यानंतर दुसऱ्या राउंडला ऋषभ पंतने 27 कोटी घेत अय्यरला याबाबतीत मागे सोडले. लखनऊने त्यांचा कर्णधार असलेल्या केएल राहुलला रिलीज केल्यामुळे त्यांना संघासाठी कर्णधाराची आवश्यकता होती. ऋषभ पंत याने मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचे सुद्धा नेतृत्व केले आहे त्यामुळे लखनऊला उत्कृष्ट फलंदाज, विकेटकीपर सह संघासाठी कर्णधार सुद्धा मिळाला आहे.

हेही वाचा :

‘कायम स्वत:साठी उभं राहा…’, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच ऐश्वर्याचा व्हिडीओ चर्चेत

‘सेक्स लाईफमुळे बाॅलिवूडमध्ये…’; वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ

‘आता मागे हटायच नाही, लढायचं’, ईव्हीएमविरोधात ‘मविआ’ मैदानात, लीगल टीमही तयार