वाढत्या तापमानाचा ठाणेकरांना फटका; १९ जण बाधित

ठाणे(thane) पालिकेच्या कौसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक १७ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली


दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उष्माघाताचा नागरिकांना(thane) त्रास होत आहे. ठाणे मीरा-भाईंदर आणि भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात १९ जणांनी वाढत्या तापमानाची बाधा झाली असून यामध्ये सर्वाधिक १७ रुग्ण हे ठाणे पालिका क्षेत्रातील आहेत.

वातावरणातील बदलामुळे सर्वत्र उष्णतेत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यासह शहरासह गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. शहरात सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने नागरिकांना त्रास जाणवत आहे.
ठाणे पालिकेच्या कौसा आणि भिवंडीच्या आझमीन नगर येथील आरोग्य केंद्रात, मीरा-भाईंदर येथील भारतरत्न इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे बाह्यरुग्ण विभागात १९ रुग्णांवर उष्माघातामुळे उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे पालिकेच्या कौसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक १७ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

तापमानाचा पारा चढाच
वाढताच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, याविषयी जिल्हा आरोग्य विभागासह जिल्ह्यातील विविध पालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. सध्यातरी शहरातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून मे मध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

दिल्लीचे अंकल आणि नवीन बाबू यांनी तुमचे पैसे लुटले;

भाजप 200 जागाही ओलांडणार नाही

आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही