महाराष्ट्रात आज 15 व्या विधानसभेसाठी (Assembly)मतदान पार पडत आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान झालं असून अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचाही समावेश आहे. रितेशने आपल्या मूळगावी म्हणजेच लातूरमधील बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुखही त्याच्याबरोबर होती.
मतदानाचा(Assembly) हक्क बजावल्यानंतर रितेश देशमुखने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस रितेशने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच त्याने काही प्रश्नांची उत्तरंही दिली. यापैकी एका प्रश्नाचं उत्तर देताना रितेशने राज्यामध्ये कोणाचं सरकार येणार याबद्दलच भाकित व्यक्त केलं.
महायुती की महाविकास आघाडी? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रितेशने, “महाविकास आघाडीचं सरकार येणार” असं ठामपणे सांगितलं. त्यानंतर रितेशला, “तुमचा अंदाज काय आहे किती जागा जिंकणार?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर रितेशने मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवत रितेशने, “हा अंदाज तर प्रसारमाध्यमं लावतील. आम्ही तर आमचा एकच अंदाज लावून आलो आहोत,” असं उत्तर दिलं.
“तुमचे दोन्ही भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्ही एवढ्या मोठ्या राजकीय कुटुंबातून येता. तुमचे काही खासगी ठोकताळे असतील ना?” असं म्हणत रितेशला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रितेशने, “माझ्या कॅलक्युलेशननुसार महाविकास आघाडीचं सरकार येणार,” एवढंच उत्तर रितेशने दिलं. “माझे दोन्ही भाऊ निवडणूक जिंकतील,” असा विश्वास रितेशने व्यक्त केला. त्यानंतर तो अगदी मनमोकळेपणे हसला.
#WATCH | Actor couple Riteish Deshmukh and Genelia D'Souza cast their votes at a polling station in Latur for #MaharashtraAssemblyElections pic.twitter.com/Zi4XzwKt2O
— ANI (@ANI) November 20, 2024
रितेश देशमुखचे सख्खे भाऊ अमित देशमुख आणि रितेश देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात असून दोघेही काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. रितेशने मागील काही दिवसांमध्ये भावांसाठी जाहीर सभांना हजेरी लावून आपल्या फिल्मी स्टाइल भाषणाने लातूरमधील मतदारांची मनं जिंकली होती.
अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, कार्तिक आर्यन, सुबोध भावे, रेणुका शहाणे, उर्मिला मातोंडकर, सलमान खान, झोया अख्तर, फरहान अख्तर, गुलजार, शाहरुख खान, श्रद्धा कपूर, राज कुमार राव, अर्जून कपूर,
हेही वाचा :
अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर धक्कादायक आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
शाळेत उशिरा आल्यामुळे दोन विद्यार्थिनींचे केस कापले, शाळेवर झाली ‘ही’ कारवाई
सरवणकरांच्या कोटवरील उलटं धनुष्यबाण पाहून अमित ठाकरेंनी काय केलं पाहा