भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज(Team India) सुरु असून शनिवारी पुण्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. न्यूझीलंडने 113 धावांनी सामना जिंकला असून यासह सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे.
तब्बल 12 वर्षांनी टीम इंडियाने(Team India) भारतात टेस्ट सीरिज गमावली. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही. आता तिसऱ्या टेस्टपूर्वी हे दोन्ही अनुभवी फलंदाज ब्रेकवर गेले आहेत.
रिपोर्टनुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे तिघे आपल्या कुटुंबासोबत शनिवारी सामना संपल्यावर मुंबईला रवाना झाले. तर टीम इंडियाचे उर्वरित खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफ रविवारी मुंबईला परततील. 1 नोव्हेंबर पासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना खेळवला जाणार असून तिसऱ्या टेस्टच्यापूर्वी दोन दिवस खेळाडूंना ब्रेक दिला जाणार आहे.
तिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी दोन दिवसांच्या ब्रेकनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू 30 आणि 31ऑक्टोबरला होणाऱ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभाग होतील. हे प्रॅक्टिस सेशन अटेंड करणं टीम इंडियाचा सर्व खेळाडूंसाठी अनिवार्य असणार असून यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही.
सहसा असे दिसून येते की वरिष्ठ खेळाडू आणि वेगवान गोलंदाज दुखापती टाळण्याबरोबरच वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन सरावात जास्त भाग घेत नाहीत किंवा हलके व्यायाम करत नाहीत. मात्र हे प्रॅक्टिस सेशन सर्वांसाठी अनिवार्य असणार आहे. सलग 18 टेस्ट सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला न्यूझीलंडकडून सलग दोनदा पराभव स्वीकारावा लागला. अशावेळी आता टीमला शेवटचा सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही.
मुंबई टेस्टसाठी टीम इंडियाची :
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.
हेही वाचा :
भाजपमधील नेते करत आहेत शिंदे गटात प्रवेश
शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार
‘मुलगी दिसायला सुंदर असेल तर…’; ‘या’ विधानामुळे अजित पवारांनी कापलं विद्यमान आमदाराचं तिकीट? पाहा Video