कवठे महाकाळमध्ये रोहित पाटील पिछाडीवर

महाराष्ट्र विधानसभा(assembly) निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. यानुसार महायुती आघाडीवर असून महाविकास आघाडी पिछाडीवर दिसतेय. कवठे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा खरंतर आर आर आबा पाटील यांचा गड. सध्या आर आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघाच्या आमदार आहेत. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे.

आर आर आबा पाटील यांना त्यांच्या हयातीत पक्षातल्या संघर्षाबरोबर विरोधकांच्या संघर्षाला देखील सामोरे जावं लागलं. गेल्या वर्षी पार पडलेल्या कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत रोहित पाटलांना सर्व विरोधकांनी एकत्रित घेरण्याचा प्रयत्न केला.

आता त्याच पद्धतीने आगामी विधानसभा (assembly)निवडणुकीत देखील विरोधकांकडून रोहित पाटलांना चितपट करण्यासाठी डाव टाकायला सुरुवात झालीय. त्यामुळे आबांच्या वारसाची वाट खडतर आहे असंच चित्र दिसतंय. कवटे महाकाळच्या मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय? हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर

‘या’ मार्गिकेवरील प्रवाशांना होणार फायदा

शरद पवारांचे मानसपुत्र केवळ ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर