नवी दिल्ली : रोहित शर्माने(Rohit Sharma) टी २० वर्ल्ड कप जिंकल्यावर भारताचा झेंडा मैदानात रोवला होता. या गोष्टीवरून आता सोशल मीडियावर रान पेटले आहे. कारण रोहितने तिरंगा रोवत असताना भारताच्या झेंड्याचा अनादर केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय किंवा कोणत्याही राष्ट्रीय ध्वजाचे नियम काय आहेत, हे आता पुन्हा एकदा समोर आले आहेत.
भरताने टी २० वर्ल्ड कप जिंकला आणि खेळाडू मैदानात विजयी यात्रेत रमलेले होते. त्याचवेळी रोहित शर्माने(Rohit Sharma) आपल्या हातातील तिरंगा हा मैदानात रोवला होता. त्यावेळी आम्ही वेस्ट इंडिजच्या धर्तीवर वर्ल्ड कपमझ्ये तिरंगा रोवला, अशा रोहित शर्माच्या भावना असतील. पण त्यामुळे आता त्याच्यावर भारताच्या ध्वजाचा अनादर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कोणत्याही राष्ट्राचा ध्वज आपल्या हातामध्ये असेल तर किंवा आपण हाताळत असू, तर त्याचे काही नियम बनवण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय ध्वजाला धक्का लागेल किंवा राष्ट्रीय ध्वजाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ देता कामा नये. कोणताही राष्ट्रीय ध्वज हा जमिनीला किंवा मैदानाला स्पर्श होता कामा नये. त्याचबरोबर राष्ट्रीय ध्वज पाण्यामध्ये ओढला जायला नको, जेणेकरून राष्ट्रीय ध्वजाचे नुकसान होईल.
रोहित शर्माने जेव्हा भारताचा ध्वज मैदानात फडकवला, तेव्हा तिरंगा हा मैदानाला स्पर्श होत होता. त्यामुळे रोहितने भारतीय ध्वजाचा अपमान केला, असे आता सोशल मीडियावर म्हटले जात आहे. पण अधिकृतपणे रोहितवर हे आरोप लावण्यात आलेले नाहीत. पण जर यापुढे रोहितवर अधिकृतपणे हे आरोप लावले गेले, तर याबाबत रोहित नेमकं काय उत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
रोहित शर्माने भावूक होऊन भारताचा झेंडा मैदानात रोवला होता. यावेळी भारतीय ध्वजाचा अपमान करण्याचा त्याला कोणताच इरादा नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी रोहित शर्मा आपले मत मांडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
हेही वाचा :
भाजपला आणखी एक मोठा झटका; माजी आमदार तुतारी हाती घेणार?
अयोध्येला गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तीन जणांचा अपघातात जागीच मृत्यू
ब्रेकिंग! वसंत मोरेंनी शिवबंधन बांधलं, ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी