मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित क्रिकेट स्टेडियमपैकी(Stadium) एक असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला यंदा 50 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होते.
रविवार 19 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर(Stadium) आयोजित कार्यक्रमात रोहित शर्मा , सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, सुनील गावस्कर अशा अनेक दिग्गज स्टार खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या या कार्यक्रमातील रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतं असून यात रोहित श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलावण्यासाठी ब्रेक डान्स करताना दिसतोय.
वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे रविवारी अनेक रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई रणजी संघासाठी आणि वानखेडे स्टेडियमवर सामने खेळून आज क्रिकेट जगतात मोठं नाव कमावलेल्या क्रिकेटर्सच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच अजय अतुल, अवधूत गुप्ते आणि गायक शेखर रावजियानी इत्यादींच्या गाण्याचा कार्यक्रम होता.
कार्यक्रम सुरु असताना शेखर रावजियानीने गाणं म्हटलं त्यावर सर्वजण थिरकायला लागले. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या क्रिकेटर श्रेयस अय्यरला स्टेजवर डान्स करण्यासाठी बोलवण्याकरता रोहित शर्माने त्याला पाहून ब्रेक डान्सची मूव्ह केली. रोहितचा हा अंदाज पाहून उपस्थित सर्व हसू लागले.
19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या भव्यदिव्य सोहळ्यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या विजेत्याला देण्यात येणारी ट्रॉफी ही वानखेडेवर आणण्यात आली होती.
यावेळी भावना व्यक्त करताना रोहित म्हणाला की, 140 कोटी भारतीयांची इच्छा पूर्ण होईल, आम्ही जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईत जाऊ तेव्हा या सर्वांचा पाठिंबा आमच्या सोबत असेल. आम्ही स्पर्धेत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची ट्रॉफी तो पुन्हा वानखेडे स्टेडियमवर आणण्याचा प्रयत्न करू.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्व महत्त्वाच्या घटना वानखेडे स्टेडियमवर घडल्या आहेत. वानखेडे स्टेडियमचा इतिहास पाहिला तर, 1983 मध्ये जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा टीम इंडिया आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथेच आली होती. 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा टीम इंडिया विजयोत्सव साजरा करण्यासाठी येथे आली होती.
#Wankhede50 #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/Lb7WWQCiJL
— Mumbai Indians (@mipaltan) January 19, 2025
2011 मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या वनडे वर्ल्ड कपचा फायनल सामना भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकून वर्ल्ड कपवर नाव कोरले. तर 2024 मध्ये देखील रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर भारतीय संघ विजयोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचीच निवड करण्यात आली होती.
हेही वाचा :
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी…
‘सैफ अली खानवरील हल्ला…’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय