रोहित शर्माची शेवटची वन डे मालिका?

फॉर्माशी झगडणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma)चॅम्पियन्स ट्ऱॉफीपूर्वी सूर मिळवण्याची शेवटची संधी आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या मालिकेतून टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करणार आहे. काल रोहितला पत्रकार परिषदेत फॉर्म विषयी प्रश्न केला गेला, तेव्हा त्याने नाराजी व्यक्त केली होती. पण, त्याला चिडून न जाता मैदानावर कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला मोठे विक्रम करण्याची संधी आहे.

रोहित(Rohit Sharma) २०२५ मध्ये त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळेल आणि डिसेंबर २०२४ मधील अपयश विसरून तो पुढे चांगली कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल. वन डे सामन्यात तीन द्विशतकं झळकावणारा रोहित हा जगातील एकमेव फलंदाज आहे आणि इंग्लंडविरुद्ध १३४ धावा केल्यास, तो आणखी एक विक्रम नोंदवेल.

रोहितने २६५ वन डे सामन्यांमध्ये ४९.१६ च्या सरासरीने १०८६६ धावा केल्या आहेत.आता ११ हजार धावांचा टप्पा त्याच्यापासून १३४ धावा दूर आहे. रोहित शर्माच्या आधी १० फलंदाजांनी ११ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा ११ वा फलंदाज ठरेल.

त्याशिवाय रोहितच्या नावावर ४८ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत आणि भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितचा तिसरा क्रमांक येतोय. सचिन तेंडुलकर १०० आंतरराष्ट्रीय शतकांसह अव्वल स्थानावर आहे आणि त्याने वन डे क्रिकेटमध्ये ४९ व कसोटीत ५१ शतकं झळकावली आहेत. विराट कोहली वन डेत ५० व कसोटीत ३० आणि ट्वेंटी-२०त १ अशा ८१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत रिकी पाँटिंग ( ७१) तिसऱ्या क्रमांकावर आहे आमि रोहित ४८ शतकांसह ११व्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहितने तीन शतकं झळकाल्यास तो १०व्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड वॉर्नरला ( ४८) मागे टाकू शकतो. त्याला ब्रायन लारा ( ५३) व माहेला जयवर्धने ( ५४) यांनाही चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत मागे टाकण्याची संधी आहे.

भारताच्या नव्या वन डे जर्सीचे अनावरण झाले होते. त्यानंतर आता या नव्या जर्सीत भारतीय संघातील खेळाडूंचे फोटोशूटही झाल्याचे समजत आहे. बीसीसीआयने १५ खेळाडूंचे नव्या जर्सीतीली फोटोही शेअर केले आहेत.या नव्या जर्सीत विविध पोझ देऊन खेळाडूंचे फोटो काढण्यात आले आहेत.या फोटोशूटमधील केवळ १५ खेळाडूंचेच फोटो बीसीसीआयने आधी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचाच फोटो नाही. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा :

‘सनम तेरी कसम’ अभिनेत्री मावरा होकेनने केले लग्न

सावधान! मोबाईलच्या अतिवापराने होऊ शकते ‘ही’ गंभीर समस्या

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा