रोहित शर्माची भर मैदानात जादू?, बेल्स फिरवल्या मग मंत्रही फुंकला; पाहा Video

चेन्नई कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिल्याच सत्रात भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेश संघाने गुडघे टेकले. याच सामन्यादरम्यानचा रोहित शर्मा(Rohit Sharma) याचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा हा स्टंपवरील बेल्सची अदलाबदली करताना दिसत आहे.

रोहित शर्मा(Rohit Sharma) आपल्या खोडकर स्वभावामुळे देखील कायमच प्रचलित असतो. रोहित शर्मा मैदानाच्या आत असो की बाहेर, त्याची मजेशीर शैली नेहमीच दिसून आली आहे. कधी त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड होतो, तर कधी त्याच्या काही मजेदार कृती कॅमेऱ्यात कैद होतात. त्याचा असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना 56 व्या षटकादरम्यान रोहित शर्मा स्टंपवरील बेल्सची अदलाबदली करताना दिसून येत आहे. 57 व्या षटकापूर्वी रोहित शर्माने स्टंपजवळ जाऊन बेल्सची अदलाबदली केली. पुढे स्लिपमध्ये जाऊन तो त्याच्या जागी उभा राहिला आणि तिथून त्याने काहीतरी मंत्राचा उच्चार देखील केला. त्याचा हाच व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर चाहते गंमतीने रोहितने जादू केली असं म्हणत आहेत. यापूर्वी विराट कोहलीचा देखील असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला होता. विराट कोहली देखील अशा प्रकारे बेल्सची अदलाबदली करताना दिसला होता. सर्वप्रथम स्टुअर्ट ब्रॉडने ही ट्रीक अॅशेस सामन्यात केली होती.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 57 वे षटक सुरू होण्यापूर्वी बेल्सची अदलाबदली केली आणि त्यानंतर 58 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने भारताला सातवी विकेट मिळवून दिली. या सामन्यात रविचंद्रन अश्विन हा सामनावीर ठरला. तसेच शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. भारताने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी 27सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

हेही वाचा:

‘लापता लेडीज’ पोहचली ऑस्कर 2025 मध्ये, चित्रपट निर्माता किरण रावचे स्वप्न झाले पूर्ण!

सतर्क! आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

राज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? ‘हा’ चेहरा चर्चेत