चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला सुरू झाला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत विजेतपद आपल्या नावे करून न्यूझीलंडचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. परंतु या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्माचे कर्णधारपदावर एक डाग पडला असून रोहित शर्माने सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) एक नकोसा विक्रम आपल्या नावार केला आहे. नाणेफेक हरल्याबरोबर रोहित शर्माच्या नावावर हा कलंक लागला आहे. कर्णधार रोहित शर्माने सलग एकूण 12 वेळा नाणेफेक गमावण्याचा विक्रम केला आहे. नोव्हेंबर 2023 पासून रोहित शर्मासाठी नाणेफेकीचा कौल अशुभ राहिला आहे. भारताने आतापर्यंत सलग 15 वेळा नाणेफेक गमावली आहे, जी एकदिवसीय सामन्यांमधली सर्वात जास्त वेळा अशी नाणेफेक गमवण्याची संख्या आहे. ज्याची सुरुवात ही या दोन संघांमध्ये अहमदाबादमध्ये 2023च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलपासून झाली आहे.
कर्णधार रोहितने गेल्या सामन्यात नेदरलँडचा कर्णधार पीटर बोरेनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. बोरेनने मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग 11 वेळा नाणेफेक गमावली होती. आता रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी साधली आहे. ऑक्टोबर 1998 ते मे 1999 या कालावधीत कॅरेबियन संघाचे कर्णधारपद सांभाळत असताना डावखुऱ्या फलंदाजाने सलग 12 वेळा नाणेफेक गमावली होती. नाणेफेक हरण्यात लारा दुर्दैवी ठरला होता.
कर्णधाराचा ओडीआयतील सर्वाधिक सलग नाणेफेक गामावण्याचा विक्रम
12 रोहित शर्मा (नोव्हेंबर 2023 – मार्च 2025) *
12 ब्रायन लारा (ऑक्टोबर 1998 – मे 1999)
11 पीटर बोरेन (मार्च 2011 – ऑगस्ट 2013)
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही संघ विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडे गोलंदाजीचे आव्हान असणार आहे. दुबईत दुपारी 2:30 पासून या सामन्याला सुरवात झाली आहे. न्यूझीलंडने 1 विकेट गमावून 59 धावा केल्या आहेत. विल यंग 23 चेंडूत 15 रन काढून वरुण चक्रवर्तीचा शिकार ठरला आहे. राचीन रविद्र आणि केन केन विल्यमसन खेळत आहेत.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडचा संघाची प्लेइंग इलेव्हन
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम
(विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि नाथन स्मिथ.
हेही वाचा :
अभिमानास्पद! चंद्रयान 2 ने उलगडलं चंद्राचं मोठं रहस्य, अद्भूत शोध; इस्त्रोही आनंदी…
टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर चमकेल, सोमवारी शेअर बाजारात दिसून येईल जोरदार हालचाल
‘तुम्ही केसरच्या नावाखाली….’, पान मसाला जाहिरातीवरुन शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला अखेर नोटीस