रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला करणार रामराम? हरभजनने केला मोठा खुलासा

रोहित शर्मा-आयपीएल २०२५ : सर्वच क्रिकेट प्रेमी आयपीएल (ipl game)२०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी प्रचंड उत्सुक आहेत. आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या संघाला नव्या नियमांप्रमाणे खेळाडूंना रिटेन करण्यासाठी नियम सांगितले आहेत. प्रत्येक संघाला त्यांच्या संघामधील ६ खेळाडूंना रिटेन करता येणार आहे.

यामध्ये कमाल ५ कॅप्ड खेळाडू संघामध्ये ठेवू शकतात त्यामध्ये भारतीय आणि परदेशी असू शकतात. तर अनकॅप्ड खेळाडूंसाठी नियम आहे की, प्रत्येक संघ कमाल २ अनकॅप्ड खेळाडू संघामध्ये राखून ठेवू शकतो. आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा संघ रिटेन करणार की नाही यावर भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने मोठे वक्तव्य केले आहे.

मागील आयपीएल(ipl game) २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदावर अनेक वृत्त समोर आले होते, असेही म्हटंले जात होते की, संघामध्ये कर्णधार पदावरून मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत होती, एवढेच नव्हे तर हार्दिक पांड्याला संघाचे कर्णधार पद दिल्यामुळे त्याला त्याला मोठ्या प्रमाणात खेळाडूंकडून त्याचबरोबर क्रिकेट प्रेक्षकांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू हरभजन सिंगने आता रोहितच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल काहीतरी मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्माचा जुना सहकारी आणि माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंगचा विश्वास आहे की रोहितला कायम न ठेवल्यास आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते असा त्याने अंदाज वर्तवला आहे.

हरभजन म्हणाला, “मुंबई इंडियन्स रोहितला कायम ठेवतात की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. जर तो लिलावात गेला तर अनेक संघ त्याला विकत घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. रोहित हा एक महान कर्णधार आणि महान खेळाडू आहे. त्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. तो 38 वर्षांचा असला तरी त्याच्यामध्ये अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. जर त्याला विकत घेतले तर लिलावात तो आला तर त्यांच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते.”

हेही वाचा:

IRCTC चं नोव्हेंबर स्पेशल टुर पॅकेज, ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!

बाप आहे की सैतान! सलग 4 वर्षे पोटच्या मुलीवर करत होता अत्याचार

करण जोहरच्या चित्रपटात ‘या’ अभिनेत्यासोबत फातिमा करणार रोमान्स