‘क्राइम पेट्रोल’मध्ये पोलिसाची भूमिका अन् आता स्वत:चं केला गुन्हा, अपहरण प्रकरणात अभिनेत्रीला बेड्या

टीव्ही मालिकेमध्ये पोलिसाची(police) भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीनेच गुन्हा केल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री शबरीनला मुलाचं अपहरण केल्याच्या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अभिनेत्री शबरीनला पालघरमधील तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. वालीव पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शबरीन छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘क्राइम पेट्रोल’ मध्ये झळकली आहे.

अटकेत असलेल्या शबरीननं सांगितलं की, क्राइम पेट्रोलसारख्या गुन्ह्यावर आधारित सत्य घटनेवरील मालिकेत काम केल्यानंतरही ती ब्रिजेशच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की, ती स्वत: चं कामही विसरली होती. यामुळेचं शबरीनने हे टोकाचं पाऊल उचललं.

शबरीनचे अपहरण केलेल्या चिमुकल्याचा काका ब्रिजेश सिंह याच्यासोबत प्रेमसंबंध होते. शबरीनला ब्रिजेशसोबत संसार थाटण्याची इच्छा होती. पण, त्यांच्या लग्नात धर्माचा मुद्दा अडसर ठरत होता. या प्रकरणात ब्रिजेशचा सहभाग आहे का, यासंदर्भात पोलिस(police) तपास करत आहे. याचं कारण म्हणजे ब्रिजेशला एका अज्ञात महिलेसोबत पाहिलं गेलं होतं.

पोलिसांनी सांगितलं की, ब्रिजेश आणि शबरीनचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जात आणि धर्माच्या मतभेदामुळे ब्रिजेशच्या कुटुंबीयांनी त्यांचं लग्न नाकारलं. शबरीनने कुटुंबियांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुटुंबीयांनी सतत विरोध केल्यामुळे शबरीनने अपहरण करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं.

वालीव पोलिसांनी सांगितले की, ब्रिजेशचा भाचा प्रिन्स शाळेमध्ये आहे. शबरीन शनिवारी अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेत पोहोचली आणि शाळा संपताच प्रिन्सला तिच्यासोबत घेऊन गेली. राजकुमार शबरीनला ओळखत असल्याने तोही तिच्यासोबत गेला. शबरीनने प्रिन्सला सांगितलं की, ती त्याला औषध आणण्यासाठी घेऊन जात आहे. शाळा सुटल्यानंतर जेव्हा प्रिन्स घरी परतला नाही तेव्हा कुटुंबीयांनी शाळेत चौकशी सुरू केली. तिथे त्यांना समजलं की, तो एका महिलेसोबत गेला होता.

वालीव पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता शबरीन प्रिन्सला तिच्यासोबत ऑटो रिक्षात घेऊन जात असल्याचं दिसलं. त्याच्यासोबत आणखी एक महिलाही होती. यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून शबरीनला वांद्रे येथून अटक करून प्रिन्सला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.

हेही वाचा:

शरद पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेताही तुतारी हाती घेणार

‘कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?’, माजी भारतीय क्रिकेटर संतापला

कागलच्या राजकारणात जाळ अन् धूर संगटच; मुश्रीफ- समरजित यांच्यात आरोप प्रत्यारोप