रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल अन्न उत्सवाचे आयोजन

इचलकरंजी, दि. १८ – रोटरी क्लब(Rotary Club) ऑफ इचलकरंजी सेंट्रल ही संस्था गेल्या ३२ वर्षांपासून सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, यावर्षी त्यांनी ‘रोटरी सेंट्रल अन्न उत्सव – फूड फेस्टिवल’ मोठ्या प्रमाणात आयोजित केला आहे. हा महोत्सव २१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान दररोज दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत केएटीपी ग्राउंड, आंबेडकर पुतळ्याजवळ होणार आहे.

महोत्सवाचे(Rotary Club) उद्घाटन मंगळवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होईल, तर समारोप २७ जानेवारीला माजी आमदार प्रकाशराव आवाडे आणि सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये इचलकरंजीसह कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आदी ठिकाणच्या ८० हून अधिक स्टॉल्समध्ये महाराष्ट्रीयन, गुजराती, पंजाबी, कोकणी, साउथ इंडियन, कॉन्टिनेंटल अशा विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध असतील.

उत्सवामध्ये विविध ग्राहक उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन देखील होणार असून घरगुती पदार्थ बनवणाऱ्या महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः ‘अन्नपूर्णा’ ही स्पर्धा नागरिकांचे आकर्षण ठरणार आहे.

दर्शनार्थींसाठी दररोज हिंदी व मराठी गीत गायन, फॅशन शो, ग्रुप डान्स, मिमिक्री, कराओके यांसारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पाककला स्पर्धांमध्ये तिळाचे गोड पदार्थ, संक्रांत थाळी, चिकन कटलेट यांसारख्या पदार्थांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

संयोजकांनी शाकाहारी आणि मांसाहारी विभाग वेगळे केले असून शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

अभिषेक बच्चनचं स्पष्टीकरण: ‘माझी इच्छा आहे की माझी लेक…

पोलिसानं कारण नसताना महिलेला चोपलं, रणथंबोर एक्सप्रेसमधील Video Viral

अभिनेता सैफ अली वर हल्ला……घटना एक, प्रश्न मात्र अनेक