दुर्दैवी! भरधाव बसची पिकअपला जोरदार धडक; रक्षाबंधनाला निघालेल्या १० मजुरांचा मृत्यू

बुलंदशहर: उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात रविवारी भीषण अपघात (bus)झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३७ जण जखमी झाले आहेत. बुलंदशहरातील सलेमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या बस आणि मॅक्सची धडक झाली.

समोरासमोर झालेल्या धडकेत मॅक्सचा चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस (bus)घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

गाझियाबादमधील कंपनीत काम करणारे कामगार रक्षाबंधनासाठी त्यांच्या घरी जात होते. तेव्हा त्यांच्या मॅक्स वाहनाला भीषण अपघात झाला. ही सगळी कामगार मंडळी अलिगढला निघाली होती. पण त्याआधीच १० जणांवर काळानं घाला घातला. बुलंदशहरमधील सलेमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोडवेज बस आणि मॅक्सची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात १० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ३७ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दुजोरा दिला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. अपघातात दगावलेल्या प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत. या अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी रस्ता अडवून धरला, काहींनी ठिय्या दिला. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप वाहनात जवळपास २० ते २२ प्रवासी होते. ते अलिगढच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी शिकारपूरकडून एक खासगी बस बुलंदशहरच्या दिशेनं भरधाव वेगात जात होती. मेरठ-बदायू महामार्गावर सलेमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलेमपूर गावाच्या समोर एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी बस आणि पिकअपचा अपघात झाला. पिकअपवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन शेतात जाऊन उलटलं. अपघातात सारेच प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, मित्रानेच मित्राला संपवलं; गोणीत गुंडाळून झुडपात फेकलं

काय सांगता! हा शेअर तुम्हाला करणार मालामाल? एका वर्षात 190 टक्क्यांनी दिलेत रिटर्न्स