बहिणीच्या हळदीसमारंभात साई पल्लवीची धूम! पाहा VIDEO

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही नेहमीच सोशल मीडियावर(VIDEO) चर्चेचा विषय ठरते. सध्या साई चर्चेत येण्याचं कारण तिच्या बहिणीचं लग्न आहे. साईचे तिची बहीण पूजा कननच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ हा पूजाच्या हळदीतला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ साई पल्लवीची बहीण पूजा कनननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत (VIDEO) पूजा कननच्या हळदीचा संपूर्ण कार्यक्रम दाखवण्यात आलं आहे. त्यावेळी कशा प्रकारे साई पल्लवी ही लग्न बंधनात अडकणाऱ्या जोडप्यासोबत मस्ती करण्याची प्लॅनिंग करताना दिसते. साई पल्लवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

साईनं पूजाला आणि विनीथला हळद लावली. त्यात ती एक बादली शोधत असते ज्यात तू पाण्यानं भरलेले फुगे हे घेऊन जाऊ शकेल आणि त्या जोडप्यासोबत सगळ्यांसोबत मिळून मस्ती करू शकेल. त्यानंतर ती सगळ्यांसोबत मिळून पूजा आणि तिचा होणारा नवरा विनिथच्या अंगावर हळद लावल्यानंतर बादलीनं पाणी घालताना दिसते. तर हा व्हिडीओ शेअर करत पूजानं कॅप्शन दिलं की ‘यावेळी फक्त हळद आणि फूलं नव्हते.’

दरम्यान, या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘याला हॅपी मॅरेज बोलतात.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पल्लवी खूप सुंदर दिसते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सगळं लक्ष हे साई पल्लवीकडे जातं.’ आणखी एक नेटकरी म्हणाला की ‘साई पल्लवी खूप सुंदर दिसते.’

साई विषयी बोलायचे झाले तर ती गेल्या अनेक दिवसांपासून रामायण या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक हे नितेश तिवारी आहेत. तर या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर दिसणार आहे. या चित्रपटाला घेऊन साई पल्लवी आणि तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. याशिवाय ती ‘थंडेल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागा चैतन्य महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापुढे ‘अमरन’ हा चित्रपट देखील लाईनअप आहे.

हेही वाचा:

महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

‘आधी ऑलिम्पिकच्या लायकीचे तर व्हा,’ नवऱ्याचं ‘ते’ विधान ऐकताच सायना नेहवाल संतापली