सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजनक खुलासा, भर कार्यक्रमात म्हणाली ‘तो मला खूप…’

अभिनेता(actor) सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीच्या रिलेशनशिपबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संगीता बिजलानीने एका रियलिटी शो दरम्यान सलमान खानसोबतच्या त्यांच्या संबंधांबाबत मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत.

संगीता बिजलानीने खुलासा केला आहे की “सलमान खान(actor) तिला शॉर्ट ड्रेस आणि डीप नेक परिधान करण्यास मनाई करायचा. तिने सांगितलं की सलमान खान नेहमी तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा.”

इंडियन आयडल 15 च्या एका कंटेस्टन्टने अभिनेत्री संगिता बिजलानी हीला सलमान खान आणि त्यांच्या लग्नाच्या बाबत प्रश्न विचारला होता. तुमच्या लग्नाची पत्रिका देखील छापण्यात आली होती हे खरे आहे का? असे विचारता सन्नाटा पसरला. त्यानंतर संगिता या प्रश्नाला काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली होती. त्यानंतर संगिता बिजलानी हीने कबूली दिली की ही गोष्ट खोटी तर नाही

संगीता बिजलानी आणि सलमान खानचे संबंध 1980 च्या दशकात खूप गाजले होते. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते आणि त्यांचं लग्न होण्याची शक्यता देखील होती. परंतु, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये अनेक समस्या होत्या ज्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. संगीता बिजलानीने सांगितलं की सलमान खान तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायचा, ज्यामुळे त्यांच्यातील संबंध दुरावले.

संगीता बिजलानीच्या या खुलासाने बॉलीवुडच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. सलमान खानच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेकदा चर्चा होत असते, परंतु अशा प्रकारचे नियंत्रण आणि प्रतिबंध हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवीन पैलू समोर आणतात.

हेही वाचा :

धोनी म्हणतो, बायकोच्या ‘त्या’ कॉम्प्लिमेंटपेक्षा मोठं काही नाही!

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणणार