बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो. एवढंच नाही तर, सलमान खान आणि ऐश्वर्याच्या(actress) अफेरच्या चर्चा आज सुद्धा चांगल्याच रंगताना पहायला मिळतात.
90 च्या दशकात सलमान खानने केलेले सर्व चित्रपट बाॅक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करायचे. पण त्याला खरी लोकप्रियता ‘मैने प्यार किया’ या सिनेमामधून मिळाली. दरम्यान, शूटिंगच्या वेळेस सलमान खानने चित्रपटातील अभिनेत्रीला त्रास दिल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल स्वतः अभिनेत्री(actress) भाग्यश्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर भाग्यश्रीनेे एका मुलाखतीत सलमान खानचे काही किस्से सांगितले. यावेळी भाग्यश्री म्हणाली की, जेव्हा आम्ही सिनेमाचं शुटिंग करत होतो, त्यावेळेस सलमान सतत माझ्या जवळ येऊन बसायचा आणि कानात सारखं एकच गाणं गायचा. दिल दिवाना बिन सजना के आमच्या या सिनेमातलं गाणं तो माझ्या कानात येऊन गुन गुनायचा.
पुढे ती म्हणाली की, जेव्हा सलमान हे गाणं बोलायचा तेव्हा माझी फार चिडचिड व्हायची. त्यानंतर मी सलमानला बाजूला घेतले आणि त्याला विचारले की हे सर्व काय आहे, तो असं का करतोय? तेव्हा सलमानने मला सांगितलं की त्याला सर्व काही माहित आहे, तर मी विचारलं की तुला काय माहित आहे, ज्यावर तो म्हणाला की त्याला हिमालयबद्दल माहिती आहे. खरंतर त्याला माझं आणि हिमालयचं अफेअर एका कॉमन फ्रेंडकडून समजलं होतं.
हेही वाचा :
काँग्रेसने दुरुस्त केलेले “उत्तर” महायुतीला खडतर आव्हान!
आयपीएल २०२५ चे रिटेन्शन कधी, कुठे लाइव्ह विनामूल्य पाहायचे?
सलमान खानला पुन्हा धमकी, तर झिशान सिद्दिकी रडारवर; फोन करत केली मोठी मागणी