सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपचं कारण समोर, सोहैल खानकडून मोठा खुलासा

९० च्या दशकात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी एकमेकांना डेट(breakup) केलं होतं. त्यांच्या प्रेमकहाणीने चाहत्यांना भुरळ घातली होती. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. जवळपास ६ वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं, आणि त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. मात्र, २००१ मध्ये त्यांच्या ब्रेकअपने चाहत्यांना मोठा धक्का दिला.

ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने सलमान खानवर(breakup) गंभीर आरोप केले होते. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, “सलमान खानच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, फसवणूक आणि अपमानाचा सामना करावा लागला.” हेच कारण होतं की तिने सलमानसोबत असलेले सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.

या वक्तव्यामुळे सलमानचा भाऊ सोहैल खानने अभिनेत्रीवर निशाणा साधला. सोहैल म्हणाला, “ऐश्वर्या कधीच सलमानसोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. ती नेहमीच घरी यायची आणि कुटुंबियांसोबत आनंदाने राहायची. पण तिने कधीच सलमानसोबतच्या नात्याचा स्वीकार केला नाही.”

सोहैल खानने पुढे असेही सांगितले की, “आता ऐश्वर्या सर्वांसमोर रडत आहे. जेव्हा ती सलमानसोबत फिरत होती, तेव्हा सलमानला जाणून घ्यायचं होतं, ऐश्वर्याच्या मनात नक्की काय होतं. यामुळे सलमानला असुरक्षित वाटत होतं.” या खुलास्यांमुळे सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दलचे अनेक प्रश्न आणि चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.

हेही वाचा :

कोल्हापूरात पावसाची विश्रांती, पूरस्थिती कायम; शाळा-महाविद्यालयांना आजही सुट्टी

शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

रणबीर- आलियाच्या लेकीचा क्युट अंदाज, कॅमेरे पाहताच राहाने पहिल्यांदाच दिल्या स्वत:हून पोझेस