बॉलिवूड अभिनेता सलमान खान आजही अविवाहीत(cycling) आहे. त्याच्या आयुष्यात आज कोणतीही मुलगी नसली तरी तो एका सीरिजस रिलेशनशिपमध्ये होता. तिच्यासोबत तो लग्न देखील करणार होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. कारण त्या आधीच त्यांचं नात मोडलं. त्यांचं लग्न तुटण्याचं कारण तिसरीच व्यक्ती होती. आता ती अभिनेत्री कोण हे तुम्ही नक्कीच ओळखू शकतात. ती दुसरी कोणी नसून संगीता बिजलानी आहे.
सलमान खान आणि संगीता बिजलानी(cycling) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वेळी एकत्र दिसतात. एकदा तर सलमान खानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संगीता ही त्या पार्टीत पोहोचली होती. जेव्हा संगीता घरी जाऊ लागली होती, तेव्हा सलमान तिला बाहेरपर्यंत सोडण्यासाठी गेला होता. तर गाडीत बसण्या आधी सलमाननं संगीताला मिठी मारली होती. खरंतर हे काही नवीन नाही कारण जेव्हा ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा सलमान तिला भेटण्यासाठी सायकलवर जायचा.
असं म्हटलं जातं की ‘गुनाहों का देवता’ च्या शूटिंग जेव्हा महबूब स्टुडियोमध्ये सुरु होती. तेव्हा सलमान खान हा शॉर्ट्स परिधान करुन सायकल चालवत संगीताला भेटायला जायचा. तर त्यावेळी त्या दोघांच्या रिलेशनशिपला बराच वेळ झाला होता. पण त्याच्या काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप जाला. त्या मागे वेगवेगळी कारणं सांगितली होती.

सलमान खान आजही संगीता बिजलानीला त्याचं पहिलं आणि खरं प्रेम बोलतात. तो तिच्या प्रेमात वेडा होता. पण रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की जेव्हा मुंबईच्या सी-रॉक हॉटेलमध्ये तो जिम आणि स्वीमिंगसाठी जायचा. तेव्हा त्याची भेट ही सोमी अलीशी झाली. त्यानंतर ते दोघं जवळ आले. रिपोर्ट्सनुसार, संगीतानं एकदा हॉटेलमध्ये सलमानला कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं होतं. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता.
संगीता बिजलानी विषयी बोलायचं झालं तर आजही तिची सुंदरता पाहता सगळ्यांना आश्चर्य होते. तरुणांनाही लाजवेल अशी तिची सुंदरता आहे. संगीताचे आजही लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. संगीताचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 5.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.
हेही वाचा :
विश्वजीत कदमांनी करून दाखवलं, सांगलीचे ‘वाघ आम्हीच’…
शरद पवारांचा नीतीश कुमार यांना साद, उपपंतप्रधान पद घेत ‘इंडिया’मध्ये येणार का?
अखेर कोल्हापुरकरांचे मत अन् मान गादीलाच! शाहू महाराजचं ठरले किंग