सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान(actor) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजान त्याच्या ‘सिकंदर’ या अपकमिंग चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.

डिसेंबर महिना भाईजानसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी खास ठरणार आहे. येत्या २७ डिसेंबरला भाईजानचा वाढदिवस आहे. भाईजानच्या वाढदिवशी त्याच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सलमान खानसाठी(actor) हा चित्रपट महत्वाचा ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या दरम्यानच अभिनेत्याने चित्रपटाची शुटिंग आटोपली आहे. चित्रपटाची संपूर्ण शुटिंग अभिनेत्याने कडक सुरक्षाव्यवस्थेत केली.

अद्याप शुटिंग सुरू असून मुंबईमध्ये अभिनेता शुटिंग करीत आहे. यापूर्वी हैद्राबादमध्ये चित्रपटाचं शेड्युल्ड होतं, ते पूर्ण झालं आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाची निर्मिती सलमान खानचा खास मित्र आणि निर्माते साजिद नाडियादवाला करणार आहेत. तर चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक ए.आर.मुरुगदोस करत आहेत.

सध्या चित्रपटाच्या फायनल शेड्युलचं शूट सुरु असून क्लायमॅक्स शूट करायचा बाकी आहे. जानेवारीच्या शेवटापर्यंत चित्रपटाचं शूट पूर्ण होणार आहे. दरम्यान ‘सिकंदर’ चित्रपटात भाईजानसोबत रश्मिका मंदानाही स्क्रिन शेअर करणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर या ॲक्शनपॅक्ड चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

सलमानचे चाहते या बहुचर्चित चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. येत्या २७ डिसेंबर रोजी सलमान खानचा ५९ वा वाढदिवस आहे. सलमान त्याच्या वाढदिवशी ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर रिलीज करत आपल्या चाहत्यांना गिफ्ट देईल, अशी चर्चा होत आहे. शिवाय, चित्रपटाचं पोस्टरही त्याच दिवशी रिलीज केलं जाणार, अशी चर्चा होत आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राईज असणार, हे नक्की.

सलमान खानच्या ५९ व्या वाढदिवशी सलमान खानचे ‘सिकंदर’ चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर लाँच केला जाईल. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘किक’ चित्रपटानंतर सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला ‘सिकंदर’ चित्रपटातून पुन्हा एकत्र येणार आहे. रिपोर्टमध्ये विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या टीझर कटिंगच्या एडिटिंगचे काम जोरात सुरू आहे.

ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला ग्रँडसन निर्मित ‘सिकंदर’ हा ॲक्शनपॅक्ड सिनेमा २०२५ मधील ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. सलमान खान व्यतिरिक्त चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी, अंजनी धवन, सत्यराजदेखील अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. सध्या चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.

हेही वाचा :

‘लाडकी बहीण’चा अर्ज झाला मंजूर, एकही हप्ता नाही ; निकषांच्या कात्रीची महिलांना भीती

‘….तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही’; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा

भर रस्त्यात उलटे उभे राहून बाईक चालवायला गेले अन्… Video