अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे (younger)कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच अभिनेत्याला प्रायव्हेट विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी सलमान खान एकटा नव्हता भाईजानसोबत त्याची गर्लफ्रेंड देखील होती. ‘सिकंदर’ सिनेमाची शुटिंग पूर्ण झाल्यानंतर भाईजान गर्लफ्रेंडसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी फिरायला निघाला आहे. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, भाईजानची गर्लफ्रेंड नक्की कोण आहे.

तर सलमान खान याची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून यूलिया वंतूर आहे. सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाईजान लग्न करणार का? असा प्रश्न देखील चाहत्यांना विचारताना दिसत आहेत.
सलमान आणि यूलिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांसोबत आहे. पण अद्याप दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ (younger) देखील व्हायरल होत असतात.
एवढंच नाही तर, यूलिया हिच्या वडिलांच्या वाढदिवसासाठी देखील भाईजान यूलिया हिच्या घरी गेलेला. तेव्हा देखील यूलियाने फोटो पोस्ट केले. शिवाय यूलिया हिचा वाढदिवस देखील खान कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेकांनी यूलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यूलिया आणि सलमान खान यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, सलमान खान याचं वय 59 वर्ष आहे. तर यूलिया हिचं वय 44 वर्ष आहे. म्हणजे सलमान आणि यूलिया यांच्या (younger)वयात 15 वर्षांचं अंतर आहे. यूलिया सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘सिकंदर’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. सिनेमा 30 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ईदच्या मुहूर्तावर अभिनेत्याचा ‘सिकंदर’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री रश्मिता मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :
51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा
सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट नवऱ्याने बायकोसोबत भयकंर कृत्य का केलं
सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं