सलमान खानचा ‘सिकंदर’ थलापती विजयच्या ‘सरकार’ चित्रपटाचा रिमेक?

बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या (remake)चाहत्यांना यावर्षी ईदच्या दिवशी एक उत्तम ईद भेट मिळणार आहे. सलमान लवकरच ‘सिकंदर’ नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, त्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोकांना हा टीझर आवडला आहे,तर, काही लोकांना हा टीझर अजिबात आवडला नाही. त्यापैकी एक नाव आहे अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके यांचे.

केआरकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे आणि सलमानच्या ‘सिकंदर’ चित्रपटावर टीका केली आहे. तो असा दावा करतो की ‘सिकंदर’ हा चित्रपट दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजय यांच्या ‘सरकार’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचा टीझर २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. vतेव्हापासून काही लोक विजय आणि सलमानच्या सिकंदर चित्रपटातील काही दृश्ये सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

तोच सीन पोस्ट करत केआरकेने लिहिले, “आता हे निश्चित झाले आहे की ‘सिकंदर’ हा थलापती विजयच्या ‘सरकार’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.”दरम्यान, सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या दोन्ही चित्रपटांच्या दृश्यांमध्ये फरक आहे. आता केआरकेचे हे विधान किती खरे आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

एआर मुरुगादोस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटात सलमानसोबत(remake) रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज या चित्रपटाचा खलनायक आहे. या चित्रपटात सलमान खान जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे, याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणे रंजक ठरेल.

हेही वाचा :

चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट

मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल

पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral