लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून ‘सिटाडेल: हनी बनी’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. ही सीरिज प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सगळ्यात सीरिजचं प्रमोशन करत असताना नागा चैतन्यसोबत घटस्फोटा झाल्याच्या 3 वर्षांनंतर आई(mother) होण्यावर समांथानं वक्तव्य केलं आहे. तिनं हे देखील सांगितलं की तिला नेहमीच आई होण्याची इच्छा होती.
यावेळी समांथा ही तिच्या आई होण्याच्या स्वप्नावर बोलताना दिसली. समांथा म्हणाली, ‘आता खूप उशिर झाला आहे असं मला वाटत नाही. माझं अजूनही आई होण्याचं स्वप्न आहे आणि हो मला आई (mother)व्हायला आवडेल. मला नेहमीच आई व्हायचं होतं. हा खूप सुंदर अनुभव आहे.
मी त्याची प्रतीक्षा करत आहे. लोकं नेहमीच वयाला घेऊन चिंता व्यक्त करतात. पण मला वाटतं की आयुष्यात अशी कोणतीच वेळ येत नाही जेव्हा तुम्ही आई होऊ शकत नाही. आता तिच्या या व्हिडीओनंतर चाहते बोलत आहेत की समांथानं आता तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन केलं आहे आणि ती भविष्याचा विचार करत आहे.’
काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्य यांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षानंतर 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर समांथानं मायोसाइटिस या आजारानं त्रस्त असल्याचं सांगितलं. आता समांथा ही आधीपेक्षा आनंदी आहे. तिनं सांगितलं होतं की ती आधीपेक्षा आनंदी आहे.
तिनं सांगितलं की मी आता माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगल्या फेजमधून जाते. त्यासोबत मला हे माहित आहे की स्वत: ची काळजी कशी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. मला वाटतं की प्रत्येक दिवस आनंदानं जगायला हवा.
हेही वाचा :
‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी’;
भ्रष्ट यंत्रणेने घुसखोरांना बनवले अधिकृत नागरिक
“केएल राहुलच्या भावनिक वक्तव्यात विराटची आठवण; RCB च्या अपूर्ण स्वप्नाची खंत व्यक्त केली”