नागा चैतन्यच्या साखरपु्ड्यात समंथाची हजेरी…

दाक्षिणात्य स्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला(filmy4wap) यांचा 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला शोभिता आणि नागा यांचे कुटुंबीय तसेच जवळचे मित्रही उपस्थित होते. हा कार्यक्रम नागार्जुनच्या हैदराबादच्या घरात पार पडला. निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या साखरपुड्याचे फोटो नागा चैतन्यचे वडील, सुपरस्टार नागार्जुन यांनी शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या साखरपुड्याला समंथानेदेखील हजेरी लावली होती. समंथा ही या सोहळ्यात नागा चैतन्यची मेहुणी म्हणून उपस्थित होती.

ही समंथा म्हणजे नागा चैतन्यची पूर्वाश्रमीची पत्नी नसून शोभिताची(filmy4wap) बहीण आहे. शोभिताची बहीण म्हणजेच नागा चैतन्यची मेहुणी समंथा धुलिपाला हिने साखरपुड्यातील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिची बहीण शोभितासोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये नागा आणि शोभिताचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे.

सामंथा धुलिपालाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, पहिल्या फोटोमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे दोघेही कुटुंबासोबत दिसत आहे. फोटो शेअर करताना समंथाने , “2022 पासून अनंतापर्यंत कायमचे.” अशी कॅप्शन दिली आहे.

समंथा धुलिपालाच्या या पोस्टच्या कॅप्शनमुळे शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य 2022 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले. शोभिता आणि नागा यांच्या नात्याची चर्चा गेल्या वर्षी हैदराबादमध्ये दिसल्यानंतर सुरू झाली होती. या दोघांनीही नात्यांच्या चर्चेबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आता मात्र, त्यांनी साखरपुड्यासह त्यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.

नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेते नागार्जुन यांनी सांगितले की, आम्ही साखरपुडा केला कारण तो शुभ दिवस होता. लग्नाची घाई नाही. चैतन्य आणि शोभिता लग्नासाठी पूर्णपणे तयार होईपर्यंत काहीही होणार नाही. साखरपुड्याला शोभिताचे आई-वडील आणि बहीणही उपस्थित होते. त्याशिवाय माझी पत्नी अमलादेखील हजर होती असेही नागार्जुन यांनी सांगितले.

नागा चैतन्य आणि समंथा रुत प्रभूची भेट ‘ये माया चेसवा’ चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यांच्यातील मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने धून धडाक्यात लग्न केलं. पण, त्यांच नातं जास्त काळ टिकलं नाही. नाग चैतन्यने ऑक्टोबर 2021 मध्ये साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिला.

हेही वाचा :

इचलकरंजीत 16 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद

यंत्रमागधारकांना दिलासा की फसवणूक? महाराष्ट्र सरकारची ऑनलाईन नोंदणी अट शिथिल, परंतु 2025 पर्यंत कायम

कांजिवरम साडी… बॉयफ्रेंडची साथ… तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर