दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य याने काही वर्षांपूर्वी अभिनेत्री समंथा प्रभू हिच्यासोबतच्या नात्याला(marriage) पूर्णविराम दिला. त्यामुळे समंथा आणि नागा चैतन्य यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबात बरीच चर्चा देखील झाली. पण त्यानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्याच्या निर्णायाने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्काही दिला.
काहीच दिवसांपूर्वी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या दोघांनीही साखरपुडा (marriage)उरकला. त्यांच्या नव्या प्रवासाला अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या. पण नागा चैतन्य आणि समंथाच्या चाहत्यांची मनं मात्र दुखावल्याचंही पाहायला मिळालं. आता या सगळ्यानंतर समंथा प्रभूच्या सोशल मीडिया पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
समंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत म्हटलं की, अनेकांचं असं मत आहे की, मैत्री आणि तुमचं रिलेशनशिप हे एकमेकांवर अवलंबून आहे. मी देखील याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. मागील काही वर्षांमध्ये मला ही गोष्ट जाणवली की, बऱ्याचदा प्रेमा समोरच्या व्यक्तीची काहीही देण्याची तयारी नसताना आपण त्या व्यक्तीला बरंच काही देतो.
जोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला परत काही देण्याच्या स्थितीत येत नाही तोपर्यंत हे सुरु राहतं. प्रेम म्हणजे खरंतर त्याग आहे आणि मी त्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे, माझ्याकडे काहीही नसताना त्यांनी मला कायम काहीतरी दिलंच आहे.
समंथा आणि नागा चैतन्यचा 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, 2021 मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल वेगळे झाल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.
घटस्फोटाच्या तीन वर्षानंतर नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी यावर भाष्य केले नव्हते. अखेर साखरपुडा करत दोघांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा:
राजकारणातील मोठी बातमी; ‘या’ आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन
शामी आणि सानिया मिर्झाच्या नव्या लूकने सोशल मीडियावर केला कहर!
रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; मोफत तांदूळ नव्हे ‘या’ 9 जीवनावश्यक गोष्टी मिळणार