संभाजी भिडे यांचा मराठा आरक्षणावर मतभेद; मनोज जरांगे यांचा प्रत्युत्तर

मुंबई: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या(reservation) मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले, “मराठा समाजाने या देशाचा इतिहास घडवला आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही. मराठ्यांनी देश सांभाळावा, आरक्षण कुठे मागता?”

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी कठोर प्रत्युत्तर दिले. जरांगे म्हणाले, “मराठा समाजाने देशासाठी मोठे योगदान दिले आहे हे सत्य आहे, पण आजच्या परिस्थितीत मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेतल्यास आरक्षणाची गरज आहे. ही आमची हक्काची मागणी आहे, कोणतीही कृपा नाही.”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रात तणावाचे वातावरण आहे, आणि या दोन नेत्यांच्या वक्तव्यांमुळे या चर्चेत नवीन वाद निर्माण झाला आहे. पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा :

रायगड हादरलं! महाबळेश्वरवरुन दर्शनाला आले, सावित्री नदीमध्ये पोहायला गेले, तिघांचा बुडून मृत्यू

मृत्यूचा जीवघेणा थरार! क्षणार्धात लाट आली अन् व्यक्तीला घेऊन… Video Viral

…तर मी केंद्रीय मंत्री असते; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? पक्ष फोडण्यावरूनही केलं मोठ वक्तव्य