कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण्यांचे(politics) साधे पान सुद्धा हलत नाही. मुळातच शिवरायांना त्यांनी राजकीय विषय बनवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पूर्णाकृती भव्य पुतळा कोसळला. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यानिमित्ताने विरोधकांनी महायुती सरकारला धारेवरच धरले नाही तर भाजपला दोषी ठरवून आकांड तांडव केले होते.
आता तर विधानसभेच्या सर्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने अनेक संवेदनशील विषय राजकारण्यांच्या (politics) कडून हाताळले जातील. राज्य संघटनेने मुंबईच्या अरबी समुद्रातील शिवस्मारक हा विषय रडारवर घेतला आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी रविवारी खास बोटीतून अरबी समुद्रात शिवस्मारक शोधाचे प्रतिकात्मक आंदोलन केले.
सुमारे दहा वर्षांपूर्वीचा तो दिवस. नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान झाले होते. मुंबईच्या अरबी समुद्रात भव्य दिव्य शिवस्मारक करण्याचा निर्णय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने घेतला होता. देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच पुतळा तिथे उभारला जाणार होता. एका नामवंत कंपनीने त्याचे डिझाईन तयार केले होते.
शिवरायांचे भव्य दिव्य शिल्प प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्याकडून बनवले जाणार होते. शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका शानदार समारंभात झाले. त्यानंतर हा महत्त्वकांक्षी शिव स्मारक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाकडून शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने शिवस्मारक जागेला दोन-तीन वेळा भेट दिली. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मात्र समितीचे पुनर्गठण करण्यात आले नाही.
शिवस्मारकाची घोषणा झाली तेव्हा स्मारकावर शेकडो कोटी रुपये खर्च करण्याऐवजी तोच पैसा गडकोट किल्ले संवर्धनासाठी वापरला जावा अशा काही जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. पण स्मारकाचे काम एका इंचानेही पुढे सरकले नाही. स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला संभाजी भिडे गुरुजी उपस्थित होते. त्यांनीही शिवस्मारकाचे काम का रखडले आहे याची सरकारकडे विचारणा केल्याचे ऐकिवात नाही.
आता हा विषय छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र(politics) स्वराज्य संघटनेने रडारवर घेतलेला आहे. रविवारी ते कार्यकर्त्यांसह, शिवप्रेमींसह अरबी समुद्रात प्रत्येकात्मक आंदोलन करणार होते. मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. नंतर मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अरबी समुद्रात बोटीने जाण्याची संभाजी राजे छत्रपती यांना परवानगी मिळाली. गेतवे ऑफ इंडिया पासून संभाजी राजे हे एका बोटीने शिवस्मारक जागेच्या शोधात निघाले.
तब्बल दोन अडीच तास त्यांची अरबी समुद्रात सैर सुरू होती. मात्र त्यांना शिवस्मारकाची जागा शोधूनही सापडली नाही. त्यानंतर संतप्त झालेल्या संभाजी राजांनी मीडियासमोर बोलताना महायुती सरकारला धारेवर धरले. भारतीय जनता पक्षावर जहाल टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक निर्धारित वेळेत होऊ शकते तर मग शिवस्मारक का होत नाही असा सवाल त्यांनी केंद्र व राज्य शासनाला केला आहे.
वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकापेक्षा उंच अन्य कोणत्याही राष्ट्रपुरुषाचे स्मारक होऊ नये म्हणून शिवस्मारकाकडे दुर्लक्ष झालेले आहे काय असाही त्यांचा सवाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील भव्य दिव्य स्मारक होणार म्हणून तमाम हिंदू, शिवप्रेमी आनंदित झाले होते. मात्र शिवस्मारकाच्या भूमिपूजनानंतर त्याचे पुढे काय झाले हे सर्व सामान्य जनतेला माहित नव्हते. रविवारी संभाजी राजे छत्रपती यांनी अरबी समुद्रात प्रत्येकात्मक आंदोलन केल्यानंतर, केंद्र आणि राज्य शासनावर टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवस्मारक का रखडले आहे याचा खुलासा केलेला.
काँग्रेस पदाधिकारी असलेल्या एका वकील महाशयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन शिवस्मारक प्रकल्पाला स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे संभाजी राजे छत्रपती यांनी काँग्रेसला सुद्धा सवाल करावा असे त्यांनी खुलासा करताना म्हटले आहे. शिवस्मारक प्रकल्पाला देण्यात आलेली स्थगिती उठवण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहेत. लवकरच ही स्थगिती उठेल आणि शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लागेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
वास्तविक अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे कोणत्या एका पक्षाचे किंवा कोणत्या एका सरकारचे काम नाही तर ते सर्वांचे आहे असे समजून सर्वपक्षीयांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेतच शिवाय काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे पदाधिकारी असलेल्या वकिलांना समजावून सांगून याचिका मागे घेण्यास सांगितले पाहिजे. तरच हे भव्य दिव्य शिवस्मारक पूर्ण होण्याचा मार्ग सुकर होईल. ज्या दिवशी स्थगिती उठेल त्या दिवसापासून शिवस्मारकाचा शोधही थांबेल.
हेही वाचा:
काँग्रेसच्या आमदाराने घेतली शरद पवारांची भेट…
दसऱ्याला भन्नाट फीचर्ससह खरेदी करा ‘ही’ बाईक
राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात