महायुती सरकारचा (political issuee)शपथविधी सोहळा आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने या सोहळ्याच्या निमंत्रणाची जाहिरात सर्वच प्रमुख वृत्तपत्रात दिली. मात्र, या जाहिरातीमध्ये शाहू महाराजांचा फोटो नसल्याने छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे, ही गोष्ट आम्ही खपवू घेणार नाही. भाजपने ही चूक दुरूस्त करावी, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातींमध्ये महापुरुषांची(political issuee) फोटो छापले. मात्र, शाहू महाराजांचा फोटो छापला नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र घडवण्यात शाहू, फुले, आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, ही गोष्ट महाराष्ट्राला मान्य नाही. शाहू महाराजांना बाजूला सारणे ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा त्यांनी दिला.
ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादावरही संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केले. ईव्हीएमबाबत अनेक पक्षांचे वेगवेगळे तर्क आहेत. त्यामध्ये न पडता आता पुढे कसे जाता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं ते म्हणाले. आता केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. जे जे शब्द दिले होते, ते आता त्यांनी पुन्हा एकदा सोडवावेत.
हेही वाचा :
शपथविधीनंतर ‘या’ दिवसपासून सुरू होणार महायुतीचे हिवाळी अधिवेशन
सत्तास्थापनेनंतर पहिला निर्णय ‘लाडकी बहीण योजने’चा ; दीपक केसरकरांनी काय सांगितलं?
आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या…; उदय सामंत यांचं मोठं विधान