‘स्थानिक आमदार सरकारसोबत…,’ विशाळगडाच्या अतिक्रमणावरून संभाजी राजेंचा गंभीर आरोप

विशाळगडावरील तोडफोड प्रकरण चांगलंच तापलं असून, याप्रकरणी संभाजीराजेंसह(latest political news) ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलंय. या घटनांच्या पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

संभाजीराजे छत्रपतींची भूमिका आणि आरोप

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “अतिक्रमण हा विषय मी उशिरा(latest political news) हाती घेतला, पण स्थानिक आमदारांनी या अतिक्रमणाला प्रोत्साहन दिलं आहे.” त्यांनी हे ही म्हटलं की, “गडकोट किल्ल्यांना निधी दिलाय, मात्र एकही नेता गडकोट विषयी बोलत नाही.”

प्रशासनावर प्रश्नचिन्ह

संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. “गजापूर इथं काय घडलं, याची पाहणी प्रशासनाने केली पाहिजे. पालकमंत्री यांना जर ही परिस्थिती माहिती असेल, तर त्यांनी पुढाकार का घेतला नाही?” असा सवाल त्यांनी केला आहे. आंदोलन होणार असल्याचं प्रशासनाला माहिती होतं, तर त्यांनी का यंत्रणा लावली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची प्रतिक्रिया

याप्रकरणी आता संभाजीराजेंसह अन्य ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलंय. यावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “माझ्यावर गुन्हा दाखल झाला, हे मला माहिती नाही. जर गुन्हा दाखल झाला असेल तर मी शाहूवाडी पोलीस ठाण्यात जाणार.”

विशाळगडावर अतिक्रमण

संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला असून, त्यांनी यासिन भटकळ ६ दिवस विशाळगडावर राहिल्याचंही आठवण करून दिली आहे.

हेही वाचा :

आघाडीतून बाहेर पडण्याची ठाकरेंची धमकी, पडद्यामागे उलथापलथी

जेवणाच्या टेस्टवरून आचाऱ्याचा हातोड्याने वार करून खून

ना मला राजकारणाची पर्वा, ना मंत्रिपद, ना आमदारकीची, पवारांच्या भेटीचं गूढ भुजबळांनी उलगडलं