भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने नताशापासून आपण विभक्त होत असल्याचं(swimming) जाहीर केलं आहे. दरम्यान हार्दिक पांड्या संध्या ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावरुन त्याने ग्रीसमधील फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोंमुळे हार्दिक पांड्या ब्रिटीश गायिका जॅस्मीन वालियाला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
हार्दिक पांड्या आणि जॅस्मीन वालिया दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावर (swimming)स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. यानंतर नेटकऱ्यांनी दोघांच्या फोटोंमधील साम्य शोधून काढलं आहे. दोघांच्या मागे असणारा स्विमिंग पूल आणि त्यामागील परिसरही सारखाच असल्याचं नेटकऱ्यांनी दाखवलं आहे. जॅस्मीनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्विमसूटमध्ये स्विमिंग पूलच्या शेजारी बसलेली दिसत आहे. यादरम्यान तिने निळ्या रंगाची मोठी हॅटही घातली आहे.
दुसरीकडे हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोतही सारखाच स्विमिंग पूल दिसत आहे. यावेळी त्याने प्रिंटेड शर्ट घातला आहे. जॅस्मीनने त्याच्या पोस्टला लाईक केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. जॅस्मीन इंस्टाग्रामावर हार्दिकला फॉलोदेखील करते.
जॅस्मीनच्या पोस्टवर एका इंस्टाग्राम युजरने कमेंट केली आहे की, “हार्दिक पांड्या आणि तू एकत्र…ग्रीसमध्ये नवं प्रेम फुलत आहे”. तर एका युजरने हार्दिक पांड्या कुठे आहे? अशी विचारणा केली आहे.
जॅस्मीनचे आई-वडील हे भारतीय वंशाचे असून तिचा जन्म हा लंडनमधील एसेक्समध्ये झालाय. ‘द ओनली वे इज एसेक्स’ या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही शोमधून जॅस्मिन खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली. 2010 मध्ये तिने एक्स्ट्री मधून सुरुवात केल्यानंतर 2012 या शोची मुख्य कलाकार बनली. या शोनंतर जॅस्मिन टीव्ही जगत सोडून म्युझिक इंडस्ट्रीकडे वळली. तिने 2014 मध्ये यूट्यूब चॅनेल सुरु केलं. या चॅनेलवर ती इतरांची गाणी गाऊन प्रसिद्ध झाली.
हेही वाचा :
केशवराव भोसले नाट्यगृह संशयाची आग धुमसतेय!
अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या बलात्कारानंतर प्रायवेट पार्टवर 50 वेळा चाकूने वार
‘दुसऱ्या बाईसाठी नाग चैतन्य शोभिताला 2027 मध्ये सोडणार’; थेट पोलीस स्टेशनमध्ये…