साने गुरुजींच्या साहित्य योगदानाचा प्रसार करण्याबरोबरच, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट रायगड जिल्ह्यातील वडघर येथे युवकांसाठी(young)प्रेरणादायी कार्य करीत आहे.
या स्मारकातून युवकांना साने गुरुजींनी दिलेल्या मानवतेच्या मंत्राचा आणि आंतरभारतीच्या संकल्पनेचा प्रसार केला जातो. स्मारकाच्या माध्यमातून मराठी साहित्याचे बिगरमराठी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्याचे इतर भाषांमध्ये अनुवाद करण्याचा उपक्रम देखील राबवला जात आहे.
स्मारकाच्या २५ व्या वर्षानिमित्त तिसऱ्या टप्प्यातील विस्ताराचे काम हाती घेतले जाणार असून, यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. दरवर्षी विविध निवासी शिबिरांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आणि युवकांना साने गुरुजींचे विचार आणि सामाजिक बांधिलकीचे शिक्षण दिले जाते. शिबिरार्थींसाठी नाममात्र शुल्क आकारून निवास व भोजन व्यवस्था केली जाते, ज्यामध्ये दरवर्षी सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी होतात.
हेही वाचा:
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतींचं संकेत, अर्जुन खोतकरांचं वक्तव्य “
“घरच्या घरी हॉटेलसारखे पनीर कटलेट बनवायचे तरी कसे? जाणून घ्या सविस्तर रेसिपी”
“‘धर्म म्हणजे स्वयंपाकघर नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण विधान”