सांगलीच्या मुरलीधर पेटकर यांच्या ‘चंदू चँपियन’ची कहाणी प्रेक्षकांना भावली

कबीर खान दिग्दर्शित ‘चंदु चॅम्पियन’ चित्रपट १४ जूनला रिलीज झालेला आहे(new film). गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाचे चाहते कौतुक करीत आहेत. मुरलीधर पेटकर यांची भुमिका अभिनेता कार्तिक आर्यन साकारत आहे. १२० कोटींमध्ये निर्मित झालेल्या ह्या चित्रपटाचे सध्या प्रेक्षकांसह समीक्षकही कौतुक करीत आहेत. एका आठवड्यातच या चित्रपटाने ३३ कोटींची कमाई केलेली आहे, जाणून घेऊया चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कमाईबद्दल…

१४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या(new film) ‘चंदू चँपियन’ चित्रपटाने आतापर्यंत ३३ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.७५ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी ७ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.७५ कोटी, चौथ्या दिवशी ५ कोटी, पाचव्या दिवशी ३.२५ कोटी, तर सहाव्या दिवशी ३ कोटींची कमाई झालेली आहे. फक्त देशातच नाही तर परदेशातही चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाला विकेंडचा फायदा झाला होता. सध्या कमाईमध्ये घट झाली असून पुन्हा एकदा विकेंडला कमाईमध्ये कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

१२० कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च वसूल करण्यासाठी निर्मात्यांना खूपच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बायोपिकमध्ये, मुरलीकांत पेटकर यांचा एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर दुखापतीतून बरा झाल्यानंतर जलतरणपटू होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास दाखवण्यात आला आहे.

मुरलीकांत पेटकर यांनी १९७० साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर १९७२ साली जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये देशाचं नाव उज्वल केलं होतं.

चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल? व्हिडीओ व्हायरल;

32 जणांनी जीव गमावला दारूचा घोट प्राणघातक ठरला; 60 हून अधिक जणांची प्रकृती गंभीर!

हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट ,पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता!