संजय मोरेचं पाऊल ‘वाकडं’ पडलं अन् घात झाला

मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या(Best bus) अपघातानं अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जीव गेला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं.

कुर्ला बेस्ट बस (Best bus) अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे. या अपघातामुळं बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर बस चालक संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालक संजय मोरेला केवळ तीन दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी संजय मोरे जूनी बस चालवायचा. त्यामुळे संजय मोरेने अपघात झाला त्यावेळी क्लच समजून चुकून अॅक्सिलरेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला, अशी धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली आहे. पोलीस याच दिशेने तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

तुमचे पती संजय मोरे काल कामावर जाताना काय घडलं होतं का?, त्यांची मानसिक स्थिती योग्य होती का?, घरातून निघताना भांडण झालं होतं का?, असा सवाल संजय मोरे यांच्या पत्नीला विचारण्यात आला. यावर जसं नेहमीप्रमाणे कामावर निघतात, तसेच ते गेले. सकाळी काहीही झालं नव्हतं. आम्ही दोघंही नेहमीप्रमाणे आमच्या स्टॉलवर गेलो. ते तिकडून 1 वाजता कामावर जायला निघाले.

ते नेहमी वेळेवर जातात. माझा नवरा दारु कधीच घेणार नाही, कधीही ते मान वर करुनही बोलले नाही. आज माझ्या लग्नाला 23 वर्षे झाली. पण अजूनपर्यंत कधीही अपघात झाला नव्हता. माझा नवरा संजय मोरे निर्दोष आहे, त्यांची नक्की सुटका होईल. कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट बघितलेलं नाही. जी घटना झाली, ते चुकून झाली आहे. त्यात काय करणार…तुमच्या गाड्या व्यवस्थित नाही. बसचा काहीतरी दोष असावा. माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाही, असं संजय मोरे यांच्या पत्नीने सांगितले.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य

“काम झाले, विषय संपला…; लाडकी बहीण योजनेवरून संतापलेला अभिनेता”

अभिनेता संजय दत्तनंतर या अभिनेत्रीची झाली एन्ट्री, टायगरसह दिसणार रोमँटिक अंदाजात!