इचलकरंजी, १० नोव्हेंबर २०२४ : इचलकरंजी येथे भारतीय जनता पार्टीच्या युवा मेळाव्यात बेळगावचे आमदार संजय पाटील यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ जोरदार भाषण केले. आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून पाटील यांनी हिंदुत्व(hindutva), देशप्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची महती अधोरेखित केली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करण्याचे आवाहन केले.
संजय पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून केली. “जर हा माझा राजा नसता, तर आज देवळात देव नसता,” असे म्हणत पाटील यांनी शिवरायांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने देशासाठी योगदान द्यावे, असा संदेश त्यांनी दिला.
हिंदुत्व(hindutva) आणि देशप्रेमाबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की भारतीय संस्कृतीचा आदर करणाऱ्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टीसाठी सर्वोपरि आहे. “आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. जो ‘भारत माता की जय’ अभिमानाने म्हणतो, त्याचा आम्ही सन्मान करतो,” असे सांगत त्यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले. कलाम हे भारतीय संस्कृतीचा आदर करणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
राम मंदिराच्या बांधणीचा उल्लेख करताना पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि काँग्रेसवर टीका केली. “काँग्रेसवाल्यांनी कोर्टात राम जन्मलाच नव्हता असे म्हटले होते, पण आज राम मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसवाले राम आहे म्हणून जोरजोरात सांगत आहेत,” असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला.
या भाषणातून संजय पाटील यांनी हिंदुत्व, भारतीय संस्कृतीचे महत्त्व, आणि देशप्रेमाची भावना श्रोत्यांमध्ये जागृत केली. त्यांच्या ओजस्वी वक्तव्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली.
हेही वाचा :
“राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारासाठी आज इचलकरंजीत जोशपूर्ण सभा”
धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवलं
कोल्हापूरच्या इचलकरंजी मतदारसंघात 268 मतदान केंद्रे; मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप सुरू