सांगली : लोकसभा निवडणुकीत मतभेद झालेल्या माजी खासदार संजयकाका पाटील (world politics) आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप जतमध्ये भक्त निवासाच्या उद्घाटनाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय काका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.
भाजपच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार(world politics) विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता. तसेच दोघांनीही निवडणूक काळात एकमेकांवर टीका केली होती. यामुळे आता जत विधानसभेबाबत संजय काका पाटील आणि विलासराव जगताप एकत्र येऊन एक भूमिका घेणार का?याकडे लक्ष आहे.
जत तालुक्यातील बिळूरमधील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात बनलेल्या भक्त निवास इमारतीचे उद्घाटन समारंभास भाजपच्या या दोन नेत्यांनी एकत्रित उपस्थिती लावली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जत मतदारसंघात हे दोन नेते एकत्र भूमिका घेणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, जत विधानसभा मतदारसंघात अनेक भाजप नेत्यांकडून जत विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. भाजपाचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी देखील आपण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले. यामुळे भाजप पक्षाची जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून डोकेदुखी होणार असे चित्र आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यापासून जत तालुक्यात दौरे, भेटीगाठी वाढवल्या आहेत. दुसरीकडे भूमिपुत्राचा मुद्दा उपस्थित करून जत मधील भाजप नेते तम्मनगौडा रवी पाटील देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी संपूर्ण जत तालुक्यात जन कल्याण संवाद पदयात्रा काढली.
आता जत मधील भाजप नेते असलेल्या प्रकाश जमदाडे यांनी देखील विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे जाहीर केल्याने उमेदवारी देताना भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
हेही वाचा:
टीम इंडियाला ‘जोर का झटका’, फिल्डिंग करताना कॅप्टन दुखापतग्रस्त
तु फक्त I Love you म्हण, रिचार्ज फ्री; ऑफर देणाऱ्याला महिलांनी शिकवला चांगलाच धडा
इचलकरंजीत भाजपचा आक्रमक निषेध: छत्रपतींच्या पुतळ्याच्या अपमानावर महाविकास आघाडीला फटकारले